₹7 च्या शेअरची कमाल, करतोय मालामाल; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 08:27 PM2024-07-28T20:27:22+5:302024-07-28T20:32:58+5:30

महत्वाचे म्हणजे, कंपनीचे मार्केट कॅप 9.56 कोटी रुपये एवढे आहे आणि मार्च 2024 पर्यंत कंपनी कर्ज मुक्त आहे.

शेअर बाजारातील जानूस कॉर्पोरेशन लिमिटेडचा ​​शेअर गेल्या शुक्रवारी 20 टक्क्यांनी वधारला. या शेअरला अप्पर सर्किट लागले होते आणि तो 7.14 रुपयांवर बंद झाला. बीएसईवर कंपनीच्या शेअर्समध्ये 11 पटीहून अधिकची उसळी दिसून आली आहे.

कंपनीचे बोर्ड मेंबर 11520000 इक्विटी जारी करण्यासंदर्भात आणि वाटपासंदर्भात तत्त्वत: मंजुरीच्या औपचारिक स्वीकृतीवर चर्चा करण्यासाठी आणि अनुमोदनासाठी सोमवारी 29 जुलै 2024 रोजी बैठक करतील, असे जानूस कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हटले आहे.

महत्वाचे म्हणजे, कंपनीचे मार्केट कॅप 9.56 कोटी रुपये एवढे आहे आणि मार्च 2024 पर्यंत कंपनी कर्ज मुक्त आहे.

अशी आहे शेअरची स्थिती - जानूस कॉर्पोरेशन लिमिटेडचा शेअर गेल्या पाच दिवासांत 15.72% ने वधारला आहे. महिन्याभरात हा शेअर 14% आणि सहा महिन्यात 20% ने वधारला आहे. या वर्षात आतापर्यंत हा शेअर 50% ने वधारला आहे. तसेच वर्षभराचा विचार करता हा शेअर एका वर्षात 81.68% पर्यंत वधारला आहे.

या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 8.95 रुपये तर नीचांक 3.60 रुपये एवढा आहे. गेल्या 2021 मध्ये हा शेअर 55 रुपयांवरून 85% पर्यंत घसरून सध्याच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे.

काय करते कंपनी? - जानूस कॉर्पोरेशन लिमिटेड पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन, सुरक्षा ऑडिट, साइट व्यवस्थापन, सुरक्षिततेचे व्यवस्थापन, सुरक्षा दस्तऐवजीकरण आणि सुरक्षा प्रक्रियांसह बांधकाम व्यवस्थापन सल्लागार सेवा प्रदान करते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)