नव्या वर्षात गुंतवणूकदारांना झटका, 'हा' शेअर ५ दिवसांपासून देतोय 'धक्के पे धक्का'; एक्सपर्ट म्हणतायत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:38 IST2025-01-09T15:27:08+5:302025-01-09T15:38:10+5:30

या वर्षाचा विचार करता, हा शेअर आतापर्यंत १३% ने घसरला आहे...

शेअर बाजारातील कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण दिसून आली. कंपनीचा शेअर आज ६% ने घसरून ६६८.२० रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर आला. गेल्या पाच दिवसांत स्टॉकमध्ये १५% ची घसरण दिसून आली. या वर्षाचा विचार करता, हा शेअर आतापर्यंत १३% ने घसरला आहे.

कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण होण्याचे कारण म्हणजे, तिचे तिमाही निकाल. खरे तर, कंपनीने मंगळवारी तिसरी तिमाही आर्थिक वर्ष २०२५ चे अपडेट्स जारी केले. यात, सण आणि लग्नातील मांगणी मुळे भारतातील व्यवसायात ४१ टक्क्यांच्या वाढीसह कंपनीच्या शुद्ध महसुलात ३९ टक्क्यांच्या वाढीच्या शक्यतेवर प्रकाश टाकण्यात आला होता. या तिमाहीत सेम-स्टोअर-सेल्समध्येही जवळपास २४ टक्क्यांची वाढ दिसून आली.

जाणून घ्या डिटेल्स - कंपनीने डिसेंबर तिमाहीत भारतात २४ कल्याण शोरूम सुरू केले आणि चालू तिमाहीत भारतात ३० कल्याण शोरूम आणि कँडेअरचे १५ शोरूम सुरू करण्याची योजना आहे. एक्सचेंज फाइलिंगनुसार, कंपनी आर्थिक वर्ष २०२६ साठी कल्याण आणि कॅन्डेअर फॉरमॅटमध्ये १७० शोरूम सुरू करण्याची योजना आखत आहे.

यात, दक्षिण भारत सोडून ७५ कल्याण शोरूम (सर्व FOCO), दक्षिण भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांत १५ कल्याण शोरूम (सर्व FOCO) आणि भारतात ८० कॅन्डेअर शोरूम असतील.

काय म्हणतायत एक्सपर्ट - आयसीआयसीआय सिक्योरिटीजने कंपनीवर ७७० रुपये प्रति शेअर (आधी 740 रुपये), अशी सुधारित टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. कंपनीने Q2FY25 साठी ६,०६५.४८ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ महसूल नोंदवला होता, जो ९.५७ टक्क्यांची वार्षिक वृद्धी दर्षवतो.

कंपनीचा ऑपरेटिंग नफा २४२.२७ कोटी रुपये (१९.३९ टक्के कमी), करपश्चात नफा १३०.६१ कोटी रुपये (२६.५३ टक्के कमी) आणि ऑपरेटिंग मार्जिन ३.९९ टक्के (२८.५३ टक्के कमी) राहिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)