Multibagger Stock 2022: 28 रुपयांच्या 'या' स्टॉकनं बनवलं कोट्यधीश, 1 लाखाचे झाले 1.29 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 05:32 PM2022-01-11T17:32:36+5:302022-01-11T17:39:20+5:30

अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. याच संदर्भात आज आम्ही आपल्याला एका अशाच स्टॉकसंदर्भात माहिती देत आहोत...

चांगल्या कमाईसाठी शेअर बाजार हा एक जबरदस्त पर्याय आहे. सध्या गुंतवणूकदार शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहेत (earning money from stock market). भागधारकांना बंपर परतावा (Stock Return) मिळत आहे. अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. याच संदर्भात आज आम्ही आपल्याला एका अशाच स्टॉकसंदर्भात माहिती देत आहोत, ज्या स्टॉकने आपल्यागुंतवणूकदारांना 15 वर्षांत कोट्यधीश बनवले...

बालाजी अमाईन्स (Balaji Amines), या स्टॉकची किंमत आज प्रति शेअर 3672.95 रुपये एवढी झाली आहे. 05 एप्रिल 2007 रोजी NSE वर या केमिकल स्टॉकची (Chemical stock) किंमत केवळ 28.42 रुपये प्रति शेअर होती. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी हा शेअर खरेदी करून संयम राखला त्यांना बंपर परतावा मिळाला आहे.

शेअर प्राइस हिस्ट्री - या स्टॉकचे रेकॉर्ड पाहता, गेल्या एका महिन्यात हा मल्टीबॅगर स्टॉक 3220 रुपयांवरून 3673 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच एवढ्याच दिवसांत जवळपास 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या 6 महिन्यांत, बालाजी अमाईन्सच्या शेअरची किंमत सुमारे 2900 रुपयांवरून 3673 रुपयांपर्यंत वाढली आहे, या काळात जवळपास 27 टक्क्यांची वाढ झाली आहे.

या शेअरनं दिले जबरदस्त रिटर्न - दुसरीकडे, गेल्या एक वर्षातील रेकॉर्ड पाहिल्यास, या शेअरची किंमत 1163 रुपयांवरून 3673 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच सुमारे 215 टक्के वाढ झाली आहे. याच वेळी, गेल्या 5 वर्षांपूर्वी हा मल्टीबॅगर स्टॉक 345च्या आसपास होता, म्हणजेच त्याने 970 टक्क्यांनी मोठी झेप घेतली आहे. 15 वर्षांपूर्वी हा मल्टीबॅगर स्टॉक 28.42 रुपये होता, जो आज 3673 रुपये प्रति शेअर झाला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने हा स्टॉक 15 वर्षांपूर्वी खरेदी केला असेल आणि तो अजूनही विकला नसेल, तर त्याला जबरदस्त परतावा मिळेल. जर गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या 1 लाखाचे 1.14 लाख झाले असते.

1 लाख रुपयांचे झाले 1.29 कोटी - यानुसारच, या मल्टीबॅगर केमिकल स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी एखाद्याने 1 लाख गुंतवले असते, तर त्याच्या 1 लाखाचे 1.27 लाख झाले असते. तर गेल्या वर्षभरात आज ते 3.15 लाख झाले असते. तसेच, एखाद्या गुंतवणूकदाराने 15 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज सुमारे 1.29 कोटी रुपये झाले असते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)