तोट्यातून नफ्यात आली कंपनी...! आता शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली; ₹99 वर पोहोचलाय भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 05:44 PM2024-08-14T17:44:01+5:302024-08-14T17:50:46+5:30

2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) कंपनीला 171.62 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

पीसी ज्वेलर लिमिटेडचे ​​शेअर्स आज शुक्रवारी फोकसमध्ये होते. कंपनीचे शेअर्स आज 5% ने वधारून 99.46 रुपयांवर पोहोचले. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. जून तिमाहीच्या निकालामुळे या शेअरमध्ये ही तेजी दुसून येत आहे.

पीसी ज्वेलर लिमिटेड जून तिमाहीत तोट्यातून नफ्यात आली आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत ज्वेलरी रिटेलर PC ज्वेलर लिमिटेडचा निव्वळ नफा 156.06 कोटी रुपये एवढा आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) कंपनीला 171.62 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

कंपनीनं काय सांगितलं? - पीसी ज्वेलरने शेअर बाजाराला दिलेल्या फाइलिंगमध्ये म्हटल्यानुसार, एप्रिल-जून तिमाहीत त्यांचे ऑपरेटिंग उत्पन्न वाढून रु. 401.15 कोटी झाले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते 67.68 कोटी रुपये होता.

पीसी ज्वेलर आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण सध्या सुरू असलेले कायदेशीर मुद्दे लवकरात लवकर निकाली काढण्यासंदर्भात ‘‘आश्वस्त’’ आहोत. यामुळे व्यवस्थापनाला व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळेल. जो गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला आहे.

कंपनीने या तिमाहीत दिल्लीमध्ये आपले एक स्टोर आणि मेरठ तसेच सहारनपूरमध्यील दोन फ्रेंचायजी स्टोर बंद केले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील दोन दुकाने तात्पुरती बंद आहेत. 30 जूनपर्यंत PC Jeweller चे भारतात 53 दुकाने आणि चार फ्रँचायझी दुकाने होती.

शेअर सातत्याने देतोय परतावा - पीसी ज्वेलर हा बीएसई स्मॉलकॅप इंडेक्सचा एक घटक आहे. बीएसई ॲनालिटिक्सनुसार गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर 37 टक्के आणि गेल्या तीन महिन्यांत 90 टक्क्यांनी वधारला आहे.

या समभागाने एका वर्षात 250 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. हा शेअर तीन वर्षांत 313 टक्क्यांनी वाधारला आहे. शेअरची 52 आठवड्यांची लो प्राइस 25.45 रुपये आहे. तसेच कंपनीचे मार्केट कॅप 4,309.64 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)