खटाखट परतावा! अक्षरशः पैशांचा पाऊस पाडतोय हा १० पैशांचा शेअर; ५ वर्षांत १३०००% ची 'तुफान' तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 04:26 PM2024-07-10T16:26:48+5:302024-07-10T16:32:03+5:30

या शेअरने गेल्या केवळ ५ वर्षांत गुंतवणूकदारांना १३२२०% एवढा जबरदस्त परतावा दिला आहे.

शेअर बाजारातील पेनी स्टॉक पल्सर इंटरनॅशनलने गेल्या ५ वर्षांत मल्टीबॅगर परतावा दिला आहे. पल्सर इंटरनॅशनचा शेअर गेल्या ५ वर्षांत १० पैशांवरून १३ रुपयांपर्यंत वधारला आहे.

या शेअरने गेल्या केवळ ५ वर्षांत गुंतवणूकदारांना १३२२०% एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. पल्सर इंटरनॅशनलच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १४.४० रुपये एढा आहे. तर नीचांक ६.०८ रुपये आहे. पल्सर इंटरनॅशनलचे मार्केट कॅप ₹८६.४५ कोटी एवढे आहे.

₹१ लाखाचे केले ₹१ कोटी - जुलै २०१९ मध्ये पल्सर इंटरनॅशनलचा शेअर १० पैशांवर होता. तो १० जुलै २०२४ रोजी १३.३२ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ५ वर्षांत हा शेअर तब्बल १३२००% पेक्षाही अधिक वधारला आहे.

एखाद्या व्यक्तीने ५ वर्षांपूर्वी पल्सर इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणून केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता तिचे मूल्य १.३३ कोटी रुपये एवढे झाले असते.

३ वर्षांत ८०००% हून अधिकचा परतावा - पल्सर इंटरनॅशनलचा शेअर गेल्या ३ वर्षात ८२१२% ने वधारला आहे. जुलै २०२१ मध्ये कंपनीचा शेअर्स १६ पैशांवर होता. जो १० जुलै २०२४ रोजी १३.३२ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ६ महिन्यांचा विचार करता, कंपनीच्या शेअर्समध्ये ६७% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

काय करते कंपनी - पल्सर इंटरनॅशनल लिमिटेड औद्योगिक आणि ग्राहकोपयोगी वस्तू, साहित्य आणि वस्तूंची खरेदी-विक्री करते. कंपनी रसायने, कीटकनाशके आणि पेट्रोकेमिकल्स आणि फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्सची डिलिंग करते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)