2 रुपयांच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, LIC सह अनेक मोठ्या बँकांनी लावलेला आहे डाव...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 00:31 IST2024-12-08T00:24:05+5:302024-12-08T00:31:23+5:30
GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही भारतातील शेअर्ड पॅसिव्ह टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरमधील आघाडीची कंपनी आहे...

शेअर बाजारात शुक्रवारी सुस्त वातावरण होते. मात्र काही पेनी शेअर्सच्या खरेदीसाठी लोक तुटून पडल्याचेही दिसून आले. यांपैकीच एक पेनी शेअर आहे जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, या शेअरची किंमत 9.95% ने वाढून 2.32 रुपयांवर पोहोचली आहे.
जुलै 2024 मध्ये हा शेअर 4.35 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. तर डिसेंबर 2024 मध्ये हा शेअर 1.04 रुपयांवर आला होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे.
असा आहे शेअरहोल्डिंग पॅटर्नचा तपशील - जीटीएल इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नसंदर्भात बोलायचे झाल्यास, प्रमोटर्सकडे 3.28 टक्के वाटा आहे. तर पब्लिक शेअरहोल्डर्सकडे कंपनीचे 96.72 टक्के शेअर आहेत. प्रमोटर्समध्ये ग्लोबल होल्डिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडकडे संपूर्ण हिस्सा आहे.
पब्लिक शेअरहोल्डर्समध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडे 7.32 टक्के हिस्सा अर्थात 93,71,54,365 शेअर्स आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेसंदर्भात बोलायचे झाल्यास, या बँकेकडे 20,00,00,000 शेअर्स अथवा 1.56 टक्के हिस्सेदारी आहे. युनियन बंक ऑफ इंडियाकडे कंपनीची 12.07 टक्के हिस्सेदारी अथवा 1,54,62,71,529 शेअर्स आहेत.
याशिवाय, बँक ऑफ बडोदाकडे 5.68 टक्के हिस्सा अथवा 72,79,74,981 शेअर्स आहेत. तसेच भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा निगमची (LIC) या पेनी स्टॉकमध्ये 3.33% एवढी हिस्सेदारी अथवा 42,6177058 एवढे शेअर्स आहेत.
काय करते कंपनी? - GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही भारतातील शेअर्ड पॅसिव्ह टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरमधील आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी वायरलेस टेलिकॉम ऑपरेटर्सद्वारे सामायिक केले जाणारे टेलिकॉम टॉवर्स आणि कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर तैनात करणे, त्याची मालकी आणि व्यवस्थानही करते.
कंपनीकडे भारतातील सर्व 22 दूरसंचार मंडळांमध्ये सुमारे 26,000 टॉवर्सचा पोर्टफोलिओ आहे. ही कंपनी 2006 मध्ये BSE आणि NSE निर्देशांकांवर सूचीबद्ध झाली. कंपनीने 2007 मध्ये राइट्स इश्यू केले होते आणि यातून निधी उभारला होता.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)