₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 07:43 PM 2024-10-07T19:43:23+5:30 2024-10-07T19:49:56+5:30
कंपनीच्या शेअरला 20% चे अप्पर सर्किट लागले. हा शएअर 19.17 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. शेअर बाजरातील मायक्रोकॅप कंपनी श्रायडस इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज सोमवारी जबरदस्त खरेदी दिसून आली. कंपनीच्या शेअरला 20% चे अप्पर सर्किट लागले. हा शएअर 19.17 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
यापूर्वी गेल्या शुक्रवारी हा शेअर 15.98 रुपयांवर बंद झाला होता. कंपनीच्या शेअरमधील या वृद्धीचे कारण म्हणजे, चालू आर्थिक वर्षातील सप्टेंबर तिमाहीचे उत्कृष्ट निकाल. खरे तर, जुलै ते सप्टेंबर कालावधीत कंपनीने प्रचंड नफा कमावला आहे.
असे आहेत डिटेल्स - सप्टेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत श्राइडस इंडस्ट्रीजचा नेट प्रॉफिट 1416.67% ने वाढून 2.73 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो सप्टेंबर 2023 ला संपलेल्या गेल्या तिमाही दरम्यान 0.18 कोटी रुपये होता.
सप्टेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत विक्री 2.15 कोटी रुपयांच्या तुलनेत 62.79% ने वाढून 3.50 कोटी रुपयांवर पोहोचली. वार्षिक आधारावर, महसूल जवळपास 63 टक्क्यांनी वाढला आहे.
कंपनीच्या शेअरची स्थिती - कंपनीचा शेअर गेल्या पाच दिवसांत 9% आणि एका महिन्यात केवळ 7% ने वधारला आहे. याचवेळी, हा शेअर या वर्षी आतापर्यंत 25% आणि गेल्या वर्षात 35% ने घसरला आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांचा विचार करता, या शेअरने 2000% चा परतावा दिला आहे. या कालावधीत हा शेअर 91 पैशांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत वाढला आहे.
कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 33.26 रुपये तर नीचांकी प्राइस 14.20 रुपये एवढी आहे. कंपनीचे मार्केट कॅप 61.37 कोटी रुपये एवढे आहे. नव्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, प्रवर्तकांकडे 25.86 टक्के हिस्सा आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांकडे उर्वरित 74.14 टक्के एवढा हिस्सा आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)