₹४ च्या शेअरनं वर्षभरात 1 लाखाचे केले ₹1 कोटी; आता लागली उतरती कळा, महिनाभरात 72% घसरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 18:46 IST2025-02-03T18:41:25+5:302025-02-03T18:46:39+5:30
गेल्या एका वर्षाच्या कालावधीत कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे...

श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड ही SAB TV या टेलिव्हिजन ब्रँडची संस्थापक आहे. गेल्या एका वर्षाच्या कालावधीत कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
२०२४ च्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअर्सची किंमत ₹ ३.७५ एवढी होती. जी फेब्रुवारी २०२५ मध्ये ₹ ३९० पर्यंत पोहोचला आहे. या कालावधीत, या शेअरने गुंतवणूकदारांच्या ₹१ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे ₹१.०४ कोटी केले.
या वर्षात आतापर्यंत हा स्टॉक सातत्याने घसरताना दिसत आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर सुमारे ७६% ने घसरला आहे.
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजनचा शेअर सातत्याने घसरत आहे. आज सोमवारीही यात ५% घट झाली आणि तो ३७१.१५ रुपयांवर आला. हा शेअर पाच दिवसांत २३% तर एका महिन्यात ७३% ने घसरला. या काळात त्याची किंमत सुमारे १४०० रुपयांवरून विद्यमान किमतीपर्यंत घसरली.
गेल्या सहा महिन्यांत, मल्टीबॅगर स्टॉकने जवळजवळ ७ टक्क्यांनी घसरण होऊन शून्य परतावा दिला आहे. त्याच वेळी, या वर्षी आतापर्यंत हा शेअर ७६% ने घसरला आहे. या काळात त्याची किंमत सुमारे १५०० रुपयांवरून विद्यमान किमतीपर्यंत घसरली आहे.
खरे तर, गेल्या सहा महिन्यांपासून बेस बिल्डिंग मोडवर राहूनही श्री अधिकारी ब्रदर्सचा शेअर, हा एका वर्षात मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या काही शेअर्सपैकी एक आहे. एकावर्षात हा मल्टीबॅगर स्टॉक 800 टक्क्यांनी वधारला. एवढेच नाही तर, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक घेल्या पाच वर्षांत 29,950 टक्क्यांनी वाढला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)