बंपर परतावा! 'या' कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणारे झाले करोडपती! 10,000 रुपयांचे झाले तब्बल 2.53 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 07:10 PM2022-06-19T19:10:17+5:302022-06-19T19:34:50+5:30

'या' शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 2,53,000 टक्के एवढा परतावा दिला आहे...

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या माध्यमाने आपण कोट्यधीशही बनू शकता. पण, यासाठी संयम बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्‍ही आपल्याला अशाच एका शेअरसंदर्भात माहिती देत आहोत. ज्याने केवळ 16 वर्षांतच गुंतवणूकदारांना थेट करोडपती बनवले आहे.

16 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये केवळ 10,000 रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना आज तब्बल 2.53 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. सिम्फनी (Symphony Ltd), असे या शेअरचे नाव आहे.

काय करते कंपनी? - ही एक कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. ही कंपनी एअर कूलर, डेझर्ट कूलर, रूम कूलर, पर्सनल कूलर आणि पोर्टेबल एअर कूलर तयार करते. ही एक अहमदाबादेतील 75 वर्ष जुनी कंपनी आहे.

एवढेच नाही, तर अमेरिका, युरोप, आशिया आणि आफ्रिकेमध्ये 60 देशांत या कंपनीची जागतिक उपस्थिती आहे. ही कंपनी मॅक्सिकोमध्ये इम्को नावाच्या एका सहायक कंपनीच्या माध्यमाने आणि चीनमध्ये केरुलाई एअर कूलरच्या माध्यमाने कार्यरत आहे.

2,53,000 टक्क्यांचा परतावा - 1994 मध्ये सिम्फनी बॉम्बे, अहमदाबाद आणि दिल्ली येथे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झाली होती. या शेअरने 16 वर्षांत 2,53,000 टक्के एवढा परतावा दिला आहे. कधीकाळी या शेअरची किंमत केवळ 0.58 रुपये एवढी होती. शुक्रवारी हा शेअर 1,455-1,466 रुपयांवर पोहोचला होता.

या शेअरनेही दिला जबरदस्त परतावा - या कालावधीतच आयशर मोटर्सनेही जबरदस्त परतावा दिला आहे. या शेअरने या कालावधीत 1,46,171 टक्के एवढा परतावा दिला. बालकृष्ण इंडस्ट्रीजचा शेअर 2001 मध्ये 1.3 रुपयांवर होता आता तो 1,661 रुपयांवर पोहोचला आहे.

यांशिवाय, जेएसडब्ल्यू स्टीलने 76,686 टक्के, नॅटको फार्माने 58,565 टक्के, कोटक महिंद्रा बँकेने 47,371 टक्के, श्री सीमेंटने 45,667 टक्के आणि वक्रांगीने 45,405 टक्के, अशा प्रकारे शॉर्ट टर्ममध्ये जबरदस्त परतावा दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)