छप्परफाड रिटर्न्स! टाटा ग्रुपच्या 'या' 12 शेअर्सनी घेतलाय रॉकेट स्पीड; गुंतवणूकदारांना करतायत मालामाल By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 08:57 PM 2022-03-27T20:57:25+5:30 2022-03-27T21:01:41+5:30
गेल्या वर्षी एका मुलाखतीत, राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी स्वतःच, टाटा ग्रुपचे शेअर्स (Tata group stocks) म्हणजे देवाचा आशीर्वाद असल्याचे, म्हटले होते. परतावा देण्याच्या बाबतीत टाटा समूहाचे शेअर्स उत्कृष्ट मानले जातात. यामुळेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी टाटा समूहाच्या शेअर्सकडे नेहमीच एक चांगला पर्याय म्हणून बघितले जाते. एवढेच नाही, तर बाजारातील दिग्गज मंडळीही टाटा समूहाच्या (Tata group) शेअर्सवर नशीब आजमावणे पसंत करतात. (Tata Group Stock performance)
गेल्या वर्षी एका मुलाखतीत, राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी स्वतःच, टाटा ग्रुपचे शेअर्स (Tata group stocks) म्हणजे देवाचा आशीर्वाद असल्याचे, म्हटले होते. खुद बिग बुल म्हणून ओळकल्या जाणाऱ्या झुनझुनवालांकडेही टाटा ग्रुपचे अनेक शेअर्स आहेत.
आज आम्ही आपल्याला टाटा ग्रुपच्या अशा कंपन्यांच्या शेअर्सची माहिती देत आहोत, ज्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना यावर्षी FY22 मध्ये जबरदस्त रिटर्न दिले आहेत. या शेअर्सनी आतापर्यंत 100 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. आणि संभाव्य मल्टीबॅगर शेअर्सच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. पाहा यादी -
1. Automotive Stampings and Assemblies Ltd - ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेम्बलीज लिमिटेडचा स्टॉक आर्थिक वर्ष 2022 (FY22) मध्ये आतापर्यंत 1339.52 टक्क्यांनी वाढून 480.80 रुपयांवर पोहोचला आहे. 31 मार्च 2021 रोजी कंपनीचा शेअर 33.4 रुपयांना होता. जो 25 मार्च 2022 रोजी वाढून 480.80 रुपयांवर पोहोचला.
2. Tata Teleservices (Maharashtra) Ltd - टाटा टेलीसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड म्हणजेच TTML चा शेअर आर्थिक वर्ष 22 मध्ये आतापर्यंत 1088.3 टक्क्यांनी वाढला. हा स्टॉक 31 मार्च 2021 रोजी 14.1 रुपये प्रति शेअर ने वाढून 25 मार्च 2022 पर्यंत 167.55 रुपयांवर पोहोचला.
3. Nelco Ltd - नेल्को लिमिटेडचा शेअर आर्थिक वर्ष 22 मध्ये आतापर्यंत 277.2 टक्क्यांनी वाढला आहे. 31 मार्च 2021ला या शेअरची किंमत 188.6 रुपये एवढी होती. ती आता 25 मार्च 2022 पर्यंत 711.40 रुपयांवर पोहोचली.
4. Tayo Rolls Ltd - टायो रॉल्स लिमिटेडचा शेअर आर्थिक वर्ष 22 मध्ये अतापर्यंत 237.76 टक्क्यांनी वाढळा आहे. हा स्टॉक 25 मार्च 2022 ला 128.35 रुपये प्रति शेअरवर पोहोचला आहे. तो 31 मार्च, 2021 रोजी 38 रुपये प्रति शेअर वर होता.
5. Tata Elxsi Ltd - टाटा एलेक्सी लिमिटेडचा शेअर आर्थिक वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत 213.73 टक्क्यांनी वाढला आहे. हा स्टॉक 31 मार्च 2021 रोजी 2693.4 रुपयांवर होता, तो आता वाढून 25 मार्च 2022 ला 8,450 रुपयांवर पोहोचला आहे.
6. Oriental Hotels Ltd - ओरिएंटल हॉटेल्स लिमिटेडचा शेअर आर्थिक वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत 171.21 टक्क्यांनी वाढून 61.70 रुपयांवर पोहोचला आहे. 31 मार्च 2021 रोजी या शेअरची किंमत 22.75 रुपये होती.
7. Automobile Corporation of Goa Ltd - ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडचा शेअर FY22 मध्ये आतापर्यंत 142.57 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 25 मार्च, 2022 ला हा स्टॉक 987 रुपयांवर पोहोचला. 31 मार्च 2021रोजी हा 406.9 रुपये होता
8. Tejas Networks Ltd - तेजस नेटवर्क्स लिमिटेडचा शेअर आर्थिक वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत, 142.39 टक्क्यांनी वाढून 25 मार्च, 2022 ला 386 रुपये झाला आहे. तो 31 मार्च, 2021 रोजी 159.25 रुपये होता.
9. Artson Engineering Ltd - आर्टसन इंजिनिअरिंग लिमिटेडचा शेअर आर्थिक वर्ष 22 मध्ये आतापर्यंत 147.4 टक्क्यांनी वाढला आहे. 25 मार्च 2022 रोजी कंपनीचा शेअर 97.35 रुपयांवर पोहोचला, जो 31 मार्च 2021 रोजी 39.35 रुपयांवर होता.
10. Tata Power - टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा शेअर FY22 मध्ये आतापर्यंत 134.01 टक्क्यांनी वाढला आहे. 25 मार्च 2022 ला कंपनीचा शेअर 241.50 रुपयांपर्यंत पोहोचला तर 31 मार्च 2021 रोजी 103.2 रुपयांवर होता.
11. The Indian Hotels Company Ltd - द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचा शेअर आर्थिक वर्ष 22 मध्ये आतापर्यंत 111.07 टक्के रिटर्न दिले आहेत. कंपनीचा शेअर 25 मार्च 2022 रोजी 226.90 रुपयांवर बंद झाला. जो 31 मार्च 2021 रोजी 107.5 रुपये प्रति शेअर होता.
12. Titan - टायटनचा शेअर 31 मार्च 2021 रोजी 1558.05 रुपयांवर होता. तो आता 25 मार्च 2022 रोजी 2,530 रुपयांवर बंद झाला आहे. यादरम्यान कंपनीने 62.39 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे.