याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 06:15 PM2024-10-02T18:15:29+5:302024-10-02T18:23:19+5:30

ट्रेंटचा शेअर गेल्या 10 वर्षांत 5300% पेक्षाही अधिकने वधारला आहे.

टाटा समूहाची कंपनी असलेल्या ट्रेंटने आपल्या भागधारकांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ट्रेंटचा शेअर गेल्या 10 वर्षांत 5300% पेक्षाही अधिकने वधारला आहे. या कालावधीत ट्रेंटचा शेअर 138 रुपयांवरून 7600 रुपयांपर्यंत वाढला आहे.

ट्रेंटच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 7939 रुपये, तर निचांकी पातळी 1946.35 रुपये आहे. दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमाणी यांनी टाटा समूहाच्या या शेअरवर मोठा डाव लावला आहे. दमाणी यांच्याकडे ट्रेंटचे 45 लाखांहून अधिक शेअर्स आहेत.

1 लाखाचे केले 54 लाख - टाटा समूहाची रिटेल कंपनी असलेल्या ट्रेंटचा शेअर 1 ऑक्टोबर 2014 रोजी 138.55 रुपयांवर होता. तो 1 ऑक्टोबर 2024 रोजी 7612.35 रुपयांवर बंद झाला होता. ट्रेंट समभागांनी या कालावधीत गुंतवणूकदारांना 5394% परतावा दिला आहे.

जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी ट्रेंटच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असेल, तर आता त्या 1 लाख रुपयांना खरेदी केलेल्या शेअर्सचे मूल्य 54.93 लाख रुपये झाले असते. ट्रेंटचे मार्केट कॅप 2,70,609.50 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

राधाकिशन दमानी यांच्याकडे ट्रेंटचे 45 लाखहून अधिक शेअर - दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमाणी यांनी त्यांच्या डेराइव्ह ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमाने ट्रेंटमध्ये गुंतवणूक केली आहे.

राधाकिशन दमाणी यांच्याकडे ट्रेंटचे 45,07,407 शेअर्स किंवा कंपनीतील 1.27% हिस्सा आहे. ट्रेंटमधील शेअरहोल्डिंगचा हा डेटा जून 2024 तिमाहीपर्यंतचा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)