TATA शेअरचं तुफान, खरेदीसाठी लोकांची झुंबड; एक्सपर्ट म्हणतायत - ₹7100 पार जाणार किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 04:33 PM2024-08-20T16:33:15+5:302024-08-20T16:48:33+5:30

कंपनीने 8 ऑगस्टला जून तिमाहीचे निकाल जारी केले. यानंतर शेअरमध्ये अधिक तेजी बगायला मिळत आहे.

शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण असताना देखील टाटा समूहाची रिटेल ब्रांच असलेल्या ट्रेंट लिमिडेटचा शेअर (Trent Limited Share) सातत्याने वधारताना दिसत आहे. कंपनीने 8 ऑगस्टला जून तिमाहीचे निकाल जारी केले. यानंतर शेअरमध्ये अधिक तेजी बगायला मिळत आहे.

हा स्टॉक सलग सहा सेशन्समध्ये नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. या कालावधीत 19% ची तेजी दिसून आली. गेल्या व्यवहाराच्या सत्रात हा शेअर ₹6,700 पार गेला आणि ₹6,750 या नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. या महिन्यात आतापर्यंत हा शेअर 14.57% ने वधारला आहे.

काय म्हणताय ब्रोकरेज - कंपनीच्या जून तिमाहीच्या निकालानंतर देशांतर्गत आणि जागतिक ब्रोकरेज कंपन्यांनी ट्रेंटबद्दल सकारात्मक दृष्टीकोन कायम ठेवला. यामुळे या शेअरची किंमत नव्या उच्चांकांवर पोहोचली आहे.

ॲक्सिस सिक्युरिटीजने स्टॉकची टार्गेट प्राइस ₹4,800 वरून ₹7,000 प्रति शेअर केली आहे. याचप्रमाणे मोतीलाल ओसवाल यांनी टाटा समूहाच्या समभागावरील टार्गेट प्राइस ₹6,080 वरून ₹7,040 प्रति शेअर केली आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचा अंदाजानुसार, हा शेअर ₹7,136 पर्यंत पोहोचेल.

जून तिमाहीचे निकाल - ट्रेंटच्या फॅशन पोर्टफोलिओने पुन्हा एकदा जबरदस्त प्रदर्शन केले असून, डबल डिजिटमध्ये सेम-स्टोअर सेल्स ग्रोथ (एसएसएसजी) मिळवली आणि आणि आपल्या किरकोळ क्षेत्रात 35%चा विस्तार केला.

या प्रभावी कामगिरीमुळे स्टँडअलोन कमाईमध्ये 57% एवढी वार्षिक वाढ झाली आहे. तसेच प्रति चौरस फूट अंदाजे विक्रीत 19% ची वाढ झाली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)