Stock Market Update: एका महिन्यात नेमके कोणते शेअर्स कोसळले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:24 IST2025-02-07T14:05:57+5:302025-02-07T14:24:57+5:30

Stock Market Update News: आधीच परदेशी गुंतवणुकदारांनी पैसे काढून घेण्यास सुरूवात केल्याचे भारतीय बाजारात दिसत असून, त्यात आता अमेरिकेच्या व्यापार युद्धाने भर टाकली आहे.

अमेरिकेडून व्यापार युद्ध सुरू झाल्याने गुंतवणूकदार धोक्याच्या मालमत्तेत गुंतवणूक टाळत असून ते सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत.

अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयासाठी २.५५ लाख कोटी रुपयांची सामान्य तरतूद करण्यात आल्याने रेल्वेचे शेअर्स तसेच इन्फ्राचे शेअर्सही कोसळले आहेत.

५.६९ टक्के घसरण बीएसई इन्फ्रा इंडेक्समध्ये झाली. बीएसई पीएसयू ४.३२ टक्क्यांनी घसरला आहे. पॉवर अँड एनर्जी इंडेक्स ७.१२ टक्क्यांनी घसरला.

गेल्या वर्षभरात ५६३.१ टक्क्यांनी वाढलेला कोचिन शिपयार्डचा शेअर मागील महिनाभराच्या काळात ६.३९ टक्क्यांनी घसरला आहे. तर वर्षभरात १०९.१५ टक्क्यांनी वाढलेला माझगाव डॉकचा शेअर महिनाभरात ३.०३ टक्के वाढला आहे.

पायाभूत क्षेत्रातील एनबीसीसी कंपनीचे शेअर्स ६.८० टक्क्यांनी घसरले आहेत. एनसीसीच्या शेअरचीही ९.२७ टक्के घसरण झाली असून, पीएफसी १०.१४ टक्के आणि आरईसी लिमिटेडचे शेअर १७.१ टक्क्यांनी खाली आले आहेत.