याला म्हणतात शेअर...! ₹35 च्या स्टॉकवर परदेशी गुंतवणूकदार खूश! खरेदीसाठी एकच झुंबड; लागलं अप्पर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 07:17 PM2024-09-03T19:17:03+5:302024-09-03T19:25:03+5:30

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) कंपनीतील त्यांची हिस्सेदारी वाढवली आहे. जी 31 मार्च, 2024 पर्यंत 0.19% ने वाढून 1.89% झाली आहे.

शेअर बाजारात विपुल लिमिटेडच्या शेअरला मंगळवारी 5% चे अप्पर सर्किटला लागले. यानंतर, कंपनीचा शेअर 35.80 रुपये प्रति शेअरवर पोहोचला होते. विपुल लिमिटेड, भारतीय रिअल इस्टेट बाजारातील एक प्रमुख कंपनी असून सध्या तिचे मार्केट कॅप 505.93 कोटी रुपये एवढे आहे.

गेल्या पाच वर्षांत 188% CAGR च्या जबरदस्त वाढीसह कंपनीची आर्थिक कामगिरी जबरदस्त राहिली आहे. 2.02x चा मूल्य-ते-कमाई (PE) रेशो आणि 101% च्या इक्विटीवरील परताव्यासह (ROE) स्टॉकचे व्हॅल्यूएशन आकर्षक आहे. या शेअरने गेल्या सहा महिन्यांत 8.66% एवढा पॉझिटिव्ह परतावा दिला आहे.

या वर्षात आतापर्यंत या शेअरने 103.12% एवढा परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये 136.75% ची तेजी आली आहे. या शेअरचा 52-आठवड्यांचा उच्चांक 55.01 रुपये तर निचांक 13.20 रुपये एवढा आहे.

असं आहे तेजीमागचं कारण - कंपनीच्या शेअरमधील ही तेजी गेल्या आठवड्यात आलेल्या एका पॉझिटिव्ह वृत्तामुळेही आलेली असू शकते. खरे तर, विपुल लिमिटेडला सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) आणि नॅशनल सिक्योरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडकडून (NSDL) क्रेडिट कन्फर्मेशन लेटर मिळाले होते.

यामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास आणखी वाढला. 31 मे 2024 पर्यंत विपुल लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवरून प्रवर्तकांचा हिस्सा 51.51% असल्याचे दिसून येते.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) कंपनीतील त्यांची हिस्सेदारी वाढवली आहे. जी 31 मार्च, 2024 पर्यंत 0.19% ने वाढून 1.89% झाली आहे. FII ची वाढलेला उत्साह एक पॉझिटिव्ह संकेत आहे आणि यामुळे शेअरमध्ये आणखी तेजी येऊ शकते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)