Stock Market Zerodha Nithin Kamath : शेअर बाजारातून पैसा कमवायचाय? झिरोदाच्या नितीन कामथ यांचा हा सल्ला लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 12:46 PM2023-03-08T12:46:51+5:302023-03-08T12:51:19+5:30

नितीन कामथ यांनी गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला दिला आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही अभ्यास न करता गुंतवणूक केली नाही तर तुम्हाला शेअर बाजारात नुकसान होण्याची शक्यता वाढते. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार आहेत जे मार्केट बुलिश असताना कंपनीच्या मूल्यांकनाकडे दुर्लक्ष करतात.

यामुळेच कोविडनंतर गुंतवणूकदार अदानी ग्रुप, वेदांत, टाटा पॉवर आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. झिरोदाचे सीईओ आणि संस्थापक नितीन कामथ यांनी अशा गुंतवणूकदारांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

कंपन्यांच्या हाय व्हॅल्युएशनवर झिरोदाचे नितीन कामथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हाय व्हॅल्युएशन अनेकदा मोठं करून दाखवलं जातं. अशा अपवादांना नियम बनवण्यापासून गुंतवणूकदारांनी वाचलं पाहिजे, असं ते म्हणाले.

आपण कोणत्याही कंपनीचं व्हॅल्युएशन पाहून खूश होतो. परंतु मी जितकं संस्थापकाशी संवाद साधतो, त्यावरून मला हाय व्हॅल्युएशन हानिकारक असल्याचं वाटतं, असंही नितीन कामथ म्हणाले.

ज्या कंपन्या अवास्तव मूल्यांकन दाखवून पैसे जमवतात त्या कंपन्यांकडे पाहून दु:ख होतं. हाय व्हॅल्युएशन अधिक खर्च करण्यास प्रवृत्त करतात. आपल्या मूल्यांकनाला न्याय देण्यासाठी प्रत्येक वेळी त्याच गतीने वाढ होणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.