Big Bull Rakesh Jhunjhunwala Portfolio : ₹९९ वर पोहोचू शकतो झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधला स्टॉक, पाहा काय म्हणतात तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 02:45 PM2022-06-04T14:45:19+5:302022-06-04T15:00:16+5:30

Big Bull Rakesh Jhunjhunwala Portfolio : शेअर बाजारातील बिग बुल समजल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचीही यात मोठी गुंतवणूक.

Big Bull Rakesh Jhunjhunwala Portfolio : शेअर बाजारात सुरू असेलेल्या विक्रीदरम्यान फेडरल बँकेच्या शेअरच्या (Federal bank stock) किंमतीनं 86 च्या खाली चार्ट पॅटर्नवर ब्रेकडाऊन दिलं. परंतु राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या या शेअरनं पुन्हा उभारी घेतली आणि तो ९० च्या स्तरावर पोहोचला.

या शेअरनं नंतर चांगली कामगिरी केली. दरम्यान फेडरल बँकेचा शेअर 93 रुपयांच्या स्तरावर गेला. जो याचा 200 दिवसांचा ईएमए (मुव्हींग एव्हरेज) आहे.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, फेडरल बँकेच्या शेअरची किंमत अलीकडील घसरणीपासून 50 टक्के रिट्रेसमेंट पातळीवर आहे. सोमवारच्या सत्रात किंवा नजीकच्या काळात स्टॉक ₹90 च्या वर टिकून राहिल्यास, तो ₹99 च्या पातळीवर जाऊ शकतो.

“फेडरल बँकेच्या स्टॉकने मे 2022 मध्ये 86 पॉईंट्सच्या खाली ब्रेकडाउन केले. त्यानंतर आम्हाला काउंटरमध्ये ₹ 93 पर्यंत तीव्र रिकव्हरी दिसली. स्टॉक पुन्हा एकदा ₹93 च्या पातळीवर आला आहे. ते याच्या 200 दिवसांच्या ईएमए स्थान होते आणि मागील घरणीच्या 50 टक्के रिट्रेसमेंट होते,” अशी माहिती फेडरल बँक शेअर प्राइस आउटलुकवर बोलताना मेहुल कोठारी, एव्हीपी-आनंद राठी यांनी दिली.

अशा प्रकारे येत्या सत्रांमध्ये केवळ 93 च्या वरच्या हालचालीमुळे र्प्प्टॉक मजबूत होण्याची शक्यता आहे. ते ₹95 ते ₹99 च्या पातळीपर्यंत जाऊ शकते. हे ₹86 ₹83 स्तरावर स्टॉप लॉससह खरेदी केले जाऊ शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Q4FY22 साठी फेडरल बँकेच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे संयुक्तपणे फेडरल बँकेचे 2.10 कोटी शेअर्स किंवा कंपनीमध्ये 1.01 टक्के हिस्सा आहे.

तर वैयक्तिक क्षमतेनुसार राकेश झुनझुनवाला यांचा बँकिंग कंपनीमध्ये 5,47,21,060 शेअर्स किंवा 2.64 टक्के हिस्सा आहे. म्हणजेच झुनझुनवाला दाम्पत्याची बँकिंग कंपनीत 3.65 टक्के भागीदारी आहे. (टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचं मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच गुंतवणूक करावी.)