DTDC Courier Subhasish Chakraborty : बँकांकडून लोन मिळालं नाही, आईचे दागिने विकले; २० हजारांत उभं केलं २ हजार कोटींचं साम्राज्य By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 10:22 AM 2024-08-26T10:22:38+5:30 2024-08-26T10:35:25+5:30
DTDC Courier Subhasish Chakraborty : पण आज आपण अशा एका व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना व्यवसायासाठी बँकेतून कर्ज मिळालं नाही, त्यांनी आईचे दागिने विकून पैसे उभे केले आणि आज त्यांचं कोट्यवधींचं साम्राज्य आहे. मेहनत करण्याची तयारी असेल आणि मनात इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच यशाचं शिखर गाठू शकता. आजवर तुम्ही अनेकांच्या यशोगाथा वाचल्या किंवा ऐकल्या असतील. पण आज आपण अशा एका व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना व्यवसायासाठी बँकेतून कर्ज मिळालं नाही, त्यांनी आईचे दागिने विकून पैसे उभे केले आणि आज त्यांचं कोट्यवधींचं साम्राज्य आहे.
मेहनत करण्याची तयारी असेल आणि मनात इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच यशाचं शिखर गाठू शकता. आजवर तुम्ही अनेकांच्या यशोगाथा वाचल्या किंवा ऐकल्या असतील. पण आज आपण अशा एका व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना व्यवसायासाठी बँकेतून कर्ज मिळालं नाही, त्यांनी आईचे दागिने विकून पैसे उभे केले आणि आज त्यांचं कोट्यवधींचं साम्राज्य आहे.
सुभाशीष चक्रवर्ती हे कोलकात्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. ते डीटीडीसीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. डीटीडीसी ही आता दोन हजार कोटींची कंपनी बनली आहे. सुभाशीष चक्रवर्ती यांनी १९९० मध्ये केवळ २० हजार रुपयांत ही कंपनी सुरू केली.
बँकांकडून कर्ज न मिळाल्यानं त्यांनी आईचे दागिनेही विकले. आज डीटीडीसी ही भारतातील एक प्रसिद्ध कुरिअर कंपनी आहे. त्यांनी १४ हजार पिन कोडचं जाळं तयार केलंय. सुभाशीष चक्रवर्ती यांच्या आजवरच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया.
सुभाशीष चक्रवर्ती यांची कहाणी संघर्ष आणि यशाचं ज्वलंत उदाहरण आहे. कोलकात्यात जन्मलेल्या शुभाशीष यांनी रामकृष्ण मिशन रेसिडेन्शियल कॉलेजमधून रसायनशास्त्राचं शिक्षण घेतलं. शिक्षणादरम्यान त्यांनी पीअरलेस नावाच्या मोठ्या विमा कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. १९८१ मध्ये कंपनीनं त्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी बंगळुरूला पाठवलं.
१९८७ मध्ये सुभाशीष यांनी पीअरलेस सोडून स्वत:चा केमिकल डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय सुरू केला. परंतु, टपाल सेवांमधील त्रुटींमुळे हा व्यवसाय यशस्वी होऊ शकला नाही. या अपयशामुळे टपाल सेवा आणि ग्राहक यांच्यात मोठी तफावत असल्याचं सुभाशीष यांच्या लक्षात आले. ही दरी भरून काढण्यासाठी त्यांनी २६ जुलै १९९० रोजी आपली कुरिअर कंपनी डीटीडीसी सुरू केली.
डीटीडीसी म्हणजे 'डेस्क टू डेस्क कुरिअर अँड कार्गो'. सुरुवातीला त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. बँकांनी त्यांना कर्ज देण्यास नकार दिला. आपली कंपनी वाचवण्यासाठी सुभाशीष यांना आईचे दागिने विकावे लागले. त्यांनी आपल्या कंपनीत केवळ २० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती.
१९९१ मध्ये शुभाशीष यांना फ्रँचायझी मॉडेलची कल्पना सुचली. यामुळे डीटीडीसीला यशाचा नवा मार्ग दिसला. या मॉडेलअंतर्गत त्यांनी कुरिअर सेवेची मागणी जास्त असलेल्या छोट्या शहरांमध्येही आपली सेवा सुरू केली. छोट्या शहरांमध्ये कुरिअर सेवेची मागणी जास्त असल्याचं सुभाशीष यांच्या निदर्शनास आलं. हे पाऊल खूप फायदेशीर ठरलं आणि डीटीडीसी अल्पावधीतच मोठं नाव बनलं.
आज डीटीडीसीकडे १४ हजार पिन कोडचं जाळं आहे. कंपनी रिटेल ग्राहकांसोबतच व्यवसायांसाठी देखील सेवा पुरवण्याचं काम करते. डीटीडीसीची २२० साइट्सवर जागतिक उपस्थिती आहे. विप्रो, इन्फोसिस आणि टाटा ग्रुप सारख्या दिग्गज कंपन्या डीटीडीसीचे ग्राहक आहेत.
२००६ पर्यंत कंपनीच्या ३,७०० फ्रँचायझी होत्या आणि त्यांनी १२५ कोटी रुपये कमावले. रिलायन्स कॅपिटलकडून ७० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाल्यानंतर डीटीडीसी १८० कोटींची कंपनी बनली. २०१० पर्यंत त्यांची विक्री ४५० कोटी रुपयांवर पोहोचली होती. २०१३ मध्ये, डीटीडीसीनं निकोस लॉजिस्टिक्समध्ये ७०% हिस्सा खरेदी केला आणि ई-कॉमर्स कंपन्यांसाठी भारतातील पहिले वितरण नेटवर्क डॉटझोटची स्थापना केली. प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे सुभाशीष चक्रवर्ती यांच्या प्रवासातून दिसून येतं.