Forest Essentials: संघर्षाचं फळ मिळालं, २ लाखांतून ₹१० हजार कोटींचं साम्राज्य उभी करणारी 'ही' महिला कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 01:23 PM2024-07-25T13:23:03+5:302024-07-25T14:50:36+5:30

Forest Essentials Success Story: जर तुमच्या मनात जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर एक ना एक दिवस यश हे नक्कीच मिळतंच. अशाच एका महिलेची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत.

Success Story: जर तुमच्या मनात जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर एक ना एक दिवस यश हे नक्कीच मिळतंच. अशाच एका महिलेची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. फॉर्च्युन मॅगझिननंही त्यांना स्थान दिलं असून त्या महिला म्हणजे मीरा कुलकर्णी.

मीरा कुलकर्णी या फॉरेस्ट एसेंशियल्सच्या संस्थापक आणि सीएमडी आहेत. त्याच्या यशाच्या प्रवासात प्रत्येक पावलावर अडथळे आले. पण, यांना त्या अजिबात घाबरल्या नाहीत किंवा डगमगल्या नाहीत.

मीरा कुलकर्णी या फॉरेस्ट एसेंशियल्सच्या संस्थापक आणि सीएमडी आहेत. त्याच्या यशाच्या प्रवासात प्रत्येक पावलावर अडथळे आले. पण, यांना त्या अजिबात घाबरल्या नाहीत किंवा डगमगल्या नाहीत.

वयाच्या २८ व्या वर्षी आई-वडिलांना गमावल्यानंतर मीरा कुलकर्णी यांनी दोन लाख रुपयांत व्यवसाय सुरू केला. हाच व्यवसाय आता १० हजार कोटींचं साम्राज्य बनला आहे. फॉर्च्यून मॅगझिननं त्यांना 'मोस्ट पॉवरफुल वुमन इन बिझनेस इन इंडिया' म्हणून संबोधलं आहे. मीरा कुलकर्णी यांच्याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊ.

मीरा यांची कहाणी कष्ट आणि चिकाटीची साक्ष देणारी आहे. पतीच्या व्यवसायातील अडचणी आणि दारूच्या व्यसनामुळे लग्न तुटल्यानंतर मीरा आपल्या दोन लहान मुलांसह आपल्या आई-वडिलांच्या घरी परतल्या. त्यानंतर वयाच्या २८ व्या वर्षी आई-वडील दोघांनाही गमावण्याचे दु:ख त्यांना सोसावं लागलं. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी जबाबदारी त्यांच्या एकट्यावरच होती. पण, मीरा यांनी हार मानली नाही. त्यांनी प्रत्येक आव्हानाला पूर्ण धैर्यानं त्या सामोरे गेल्या.

वयाच्या ४५ व्या वर्षी मुलीच्या लग्नानंतर मीरा यांना मेणबत्त्या आणि हँड मेड साबणाची आवड निर्माण झाली. या छंदाचं नंतर व्यावसायिक कल्पनेत रूपांतर झालं आणि २००० मध्ये त्यांनी फॉरेस्ट एसेंशियल्सची स्थापना केली.

अवघ्या दोन लाख रुपयांपासून आणि एका छोट्या गॅरेजमध्ये दोन कर्मचाऱ्यांपासून सुरुवात करून मीरा यांनी नॅचरल इनग्रेडियंट्सवर लक्ष केंद्रित केलं. आयुर्वेदाचा वापर करून आपल्या उत्पादनांना त्यांनी खास बनवलं. त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं आणि कंपनीनं झपाट्यानं प्रगती केली. आज भारतातील २८ शहरांमध्ये फॉरेस्ट एसेंशियल्सचा व्यवसाय पसरलेला आहे. इतकंच नाही तर आता हा कोट्यवधींचा व्यवसाय बनलाय.

२००८ मध्ये, एस्टी लॉडर कंपनीजनं फॉरेस्ट एसेंशियल्समध्ये हिस्सा विकत घेऊन महत्त्वपूर्ण भागीदारी केली. हयात आणि ताज सारख्या प्रतिष्ठित हॉटेल चेनसह सहकार्यामुळे ब्रँडची प्रतिष्ठा आणखी वाढली. कोटक वेल्थ हुरुनच्या २०२० च्या लिस्टनुसार, मीरा यांची नेटवर्थ १,२९० कोटी रुपये होती.

फॉरेस्ट एसेंशियल्सचे आता भारतात ११० हून अधिक स्टोअर्स आहेत. त्यांची स्टोअर्स निवडक आंतरराष्ट्रीय ठिकाणी देखील उपलब्ध आहेत. हा ब्रँड आपली उत्पादनं ताज आणि हयात सारख्या लक्झरी हॉटेल चेन तसंच जगभरातील हाय एन्ड स्पामध्ये पुरवण्याचं काम करतो.

मेहनत आणि चिकाटीमुळे स्वप्नं कशी प्रत्यक्षात साकार होऊ शकतात हे मीरा कुलकर्णी यांच्या या प्रवासातून दिसून येतं. आव्हानांना तोंड देण्याची आणि आपली आवड जोपासण्याची त्यांची वृत्ती त्यांना एक यशस्वी उद्योजक बनवते. त्यांचा प्रवास इतरांनाही प्रेरणा देतो.