Pension Plan: सुपर डुपर हिट योजना! २०० रुपये गुंतवा, एकरकमी दीड कोटी अन् महिन्याला ५० हजारांची पेन्शन By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 08:56 AM 2023-01-15T08:56:40+5:30 2023-01-15T09:02:01+5:30
नोकरदार लोकांसाठी निवृत्तीनंतरची सोय आतापासूनच करावी लागते. स्वत:ला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रत्येकजण कुठे ना कुठे पैसे गुंतवत असतो. परंतू, हा पैसा योग्यरित्या गुंतवला तरच त्याचा चांगला परतावा मिळतो. नोकरदार लोकांसाठी निवृत्तीनंतरची सोय आतापासूनच करावी लागते. स्वत:ला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रत्येकजण कुठे ना कुठे पैसे गुंतवत असतो. परंतू, हा पैसा योग्यरित्या गुंतवला तरच त्याचा चांगला परतावा मिळतो. नाहीतर पैशापरी पैसा जातो पण येत काही नाही. आजची महागाई आणि खर्च पाहता पीएफची १०-१५ हजाराची पेन्शन काही पुरेल असे वाटत नाहीय. यामुळे भरघोस रक्कम हातात येणे आवश्यक आहे.
पगाराचा काही भाग हा अनेक प्रकारच्या सेव्हिंग स्किममध्ये गुंतविला जातो. सरकारदेखील अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. लाँग टर्मसाठी पगाराचा एक हिस्सा बाजुला काढला जात असते. त्यापैकीच तुम्हाला रोज २०० रुपये तुम्हाला बाजुला काढायचे आहेत.
राष्ट्रीय पेन्शन स्कीम, एनपीएस ही रिटायरमेंट फंड बनविण्याची सर्वात पसंतीची स्कीम आहे. NPS ही दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. या योजनेत तुम्ही नोकरीदरम्यान पैसे जमा करता, जे तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरूपात परत मिळतात. गुंतवणूकदाराला NPS मध्ये जमा केलेले पैसे दोन प्रकारे मिळतात.
तुम्ही गुंतवलेल्या रकमेचा मर्यादित भाग एकाच वेळी काढू शकता. त्याच वेळी, दुसरा भाग पेन्शनसाठी जमा केला जातो. तुम्ही अॅन्युइटी विकत घेण्यासाठी जितके जास्त पैसे मोजाल, तितकी जास्त पेन्शन तुम्हाला निवृत्तीनंतर मिळेल.
ही योजना थेट सरकारशी जोडलेली आहे आणि या योजनेत दरमहा 6000 रुपये गुंतवून तुम्हाला 60 वर्षे वयानंतर 50,000 रुपये पेन्शन मिळू शकते. या योजनेत दररोज 200 रुपयांची बचत करून गुंतवणूक करावी लागेल. शिवाय आयकरातही सूट मिळेल. NPS मध्ये, गुंतवणूकदाराला 80C अंतर्गत सूट मिळते तसेच 80 CCD अंतर्गत रु. 50,000 पर्यंत अतिरिक्त आयकर सूट मिळते.
वयानुसार म्हणजेच २४ वर्षांचे असताना या योजनेत पैसे गुंतवायला सुरुवात केली तर ३६ वर्षे पैसे गुंतवावे लागतील. 25,92,000 रुपये जमा होतील. जर तुम्हाला १० टक्क्यांचा जरी रिटर्न मिळाला तरी त्याची रक्कम 2,54,50,906 रुपये होईल. ४० टक्क्यांची अॅन्यूईटी घेतली तर ही रक्कम 1,01,80,362 रुपये होते. १० टक्क्यांचा विचार केल्यास 1,52,70,544 लंप सम इनकम होईल, तसेच साठीनंतर ५० हजारांची पेन्शन मिळत राहील.