Swiggy ची UPI मार्केटमध्ये एंट्री, तुम्ही एकाच ॲपद्वारे करू शकाल पेमेंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 06:32 PM2024-08-14T18:32:25+5:302024-08-14T18:51:11+5:30

Swiggy Started Upi Payment Service : ग्राहकांना अधिक चांगला पेमेंट अनुभव देण्यासाठी कंपनीनं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं (NPCI) यूपीआय प्लग-इन (UPI Pluggin) इंटीग्रेट केलं आहे.

नवी दिल्ली : स्विगीनं (Swiggy) आज आपल्या प्लॅटफॉर्मवर स्विगी यूपीआय (Swiggy UPI) सर्व्हिस सुरू करण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांना अधिक चांगला पेमेंट अनुभव देण्यासाठी कंपनीनं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं (NPCI) यूपीआय प्लग-इन (UPI Pluggin) इंटीग्रेट केलं आहे.

या इंटीग्रेशनसह युजर्स आता स्विगी ॲपवरून बाहेर न पडता यूपीआय व्यवहार पूर्ण करू शकतील. यामुळं पेमेंट प्रक्रिया सुलभ झाली आहे. जसपेच्या (Juspay) हायपर यूपीआय प्लगइनद्वारे (Hyper UPI Pluggin) संचालित ही नवीन सुविधा थर्ड पार्टी यूपीआय ॲप्सवर रिडायरेक्ट करण्याची आवश्यकता दूर करते. हे युजर्ससाठी पेमेंट एक्सपिरियन्स पूर्णपणे सोपे होते.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एप्रिल २०२४ मध्ये सांगितलं होतं की, भारतात जवळपास ३१३ बिलियन यूपीआय ट्रांजेक्शन नोंदवले गेले आहेत. यूपीआयची लोकप्रियता वाढत असताना, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) अधिकाधिक संस्थांना यूपीआय सेवा इंटिग्रेट करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

स्विगीचं हे पाऊल ट्रांजेक्शनचा वेळ कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिझाइन केलं आहे. थर्ड पार्टी ॲप्सवर रीडायरेक्शनला हटवून स्विगी यूपीआय एक साधे आणि आनंददायी युजरर्स अनुभव प्रदान करेल. यामुळं ट्रांजेक्शनची वेळ १५ सेकंदांवरून फक्त ५ सेकंदांपर्यंत कमी होते.

स्विगीचे रेव्हेन्यू आणि ग्रोथ हेड अनुराग पंगानामुला म्हणाले, "आम्हाला आमच्या ग्राहकांना यूपीआय सर्व्हिस सादर करताना खूप आनंद होत आहे. यूपीआय हा सर्वात पसंतीच्या पेमेंट पर्यायांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत हा पर्याय स्विगीच्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे. ट्रांजेक्शन सुलभ करून आणि पेमेंट फेल होणं कमी करून, आम्हाला खात्री आहे की ही सुविधा स्विगीवरील ग्राहक अनुभव वाढवेल."

ॲपच्या पेमेंट पेजला भेट देऊन आणि Swiggy UPI निवडून ग्राहक त्यांचे बँक खाते लिंक करण्यासाठी एक-वेळची सेटअप प्रक्रिया पूर्ण करू शकतात. या सेटअपनंतर, प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी, त्यांना फक्त त्यांचा यूपीआय पिन टाकावा लागेल, ज्यामुळे ट्रांजेक्शन फास्ट होईल. याव्यतिरिक्त, इन-हाऊस प्लग-इन अनुभव ग्राहकांना पेमेंट प्रवासातील कोणत्याही समस्यांबद्दल त्वरित सूचित करेल.