Syrma SGS IPO : ६० रूपयांच्या जवळ पोहोचला या IPO चा ग्रे मार्केट प्रीमिअम, जबरदस्त लिस्टिंग होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 03:13 PM2022-08-22T15:13:18+5:302022-08-22T15:19:29+5:30

सुमारे अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नुकताच सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा (Syrma SGS) आयपीओ बाजारात दाखल झाला आहे.

Syrma SGS IPO : सुमारे अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नुकताच सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा (Syrma SGS) आयपीओ बाजारात दाखल झाला आहे. Sirma SGS IPO आता सबस्क्रिप्शनसाठी बंद झाला आहे. गुंतवणूकदारांची नजर आता सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीच्या शेअर्सच्या अलॉटमेंटकडे आहे.

840 कोटी रुपयांच्या या पब्लिक इश्यूमधील शेअर्सचं अलॉटमेंट 23 ऑगस्ट 2022 रोजी केले जाऊ शकते. दरम्यान, ग्रे मार्केटमध्ये सिरमा SGS च्या IPO साठी प्रीमियम वाढतच आहे. बाजार निरीक्षकांच्या मते, सिरमा SGS टेक्नॉलॉजीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये सोमवार 22 ऑगस्ट 2022 रोजी 58 रुपयांच्या प्रीमियमवर मिळत आहेत.

सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीच्या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम (जीएमपी) सोमवारी ५८ रुपये होता. शुक्रवारी संध्याकाळी कंपनीच्या शेअर्सचा प्रीमियम 59 रुपयांच्या पातळीवर होता. Sirma SGS चा IPO 12 ऑगस्ट 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि 18 ऑगस्ट रोजी बंद झाला.

कंपनीच्या IPO ला बाजारात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हा IPO 32.61 पटींनी सबस्क्राइब झाला आहे. या पब्लिक इश्यूचा रिटेल कोटा 5.53 पट सबस्क्राइब झाल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी सिरमा एसजीएसच्या शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम 58 रुपये होता. सिरमा एसजीएस आयपीओची किंमत 209 ते 220 रुपये आहे. जर कंपनीचे शेअर्स 220 रुपयांच्या वरच्या किंमतीच्या बँडवर अलॉट केले गेले आणि ते 58 रुपयांच्या प्रीमियमवर लिस्ट केले गेले, तर कंपनीचे शेअर्स 278 रुपयांच्या जवळ मार्केटमध्ये लिस्ट होऊ शकतात.

याचाच अर्थ कंपनीचे शेअर्स सुमारे 22 टक्के प्रीमियमवर लिस्ट होऊ शकतात. सिरमा एसजीएसच्या IPO साठी ग्रे मार्केट प्रीमियम सातत्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांत तो 20 रुपयांवरून 48 रुपयांवर गेला आहे. 48 रुपयांनंतर तो 59 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. सध्या, सोमवारी सिरमा एसजीएसचा प्रीमियम 58 रुपये आहे. (टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)