31 डिसेंबरपूर्वीच उरकून घ्या ही कामं, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 09:24 PM2018-12-26T21:24:03+5:302018-12-26T21:27:36+5:30

31 डिसेंबर अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपला आहे. नव्या वर्षात बऱ्याच नवी गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत. 31 डिसेंबरपूर्वीच तुम्हाला अनेक आर्थिक कामं करून घ्यावी लागणार आहेत.

तसेच 31 डिसेंबरच्या आत तुम्ही रिटर्न फाइल केली नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. हा दंड 5 हजार रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत असू शकतो.

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सगळ्या मेगास्ट्राइप(काळी पट्टी असलेले कार्ड) कालबाह्य ठरणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ते 31 डिसेंबरपूर्वीच बदलून घ्यावे लागणार आहेत. कारण 31 डिसेंबरनंतर ते कार्ड निष्क्रिय होणार आहे.

बँकांनी सीटीएस नसलेल्या चेकनं व्यवहार करणं आता बंद केलं आहे. 31 डिसेंबरनंतर बिगर सीटीएसचे चेक स्वीकारले जाणार नाहीत. CTS चेकला तपासण्यासाठी चेकच्या उजव्या बाजूला 'CTS 2010' असं लिहिलं असतं.

1 डिसेंबर 2018पासून स्टेट बँक ऑफ इंडियानंही ज्यांचे मोबाईल क्रमांक खात्यासोबत जोडला नाही, अशा खातेदारांची नेट बँकिंगची सुविधा बंद करण्यात येणार आहे.

टॅग्स :एटीएमatm