TATA group Stocks : टाटा समुहाचे दोन 'सिक्रेट स्टॉक्स' गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, वर्षभरात पैसे झाले दहापट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 10:50 AM2022-03-12T10:50:08+5:302022-03-12T10:56:56+5:30

TATA group Stocks :टाटा समुहाच्या या दोन सिक्रेट शेअर्सनं गुंतवणूकदारांना केलंय मालामाल.

Tata group hidden stock: टाटा समुहावर असलेल्या विश्वासामुळे अनेकदा गुंतवणूकदार (Investors) शेअर बाजारात (Stock Market) टाटा समुहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकीचे पर्याय शोधत असतात. आज आम्ही तुम्हाला असे शेअर्स सांगणार आहोत, जे प्रसिद्ध नाहीत परंतु त्यांनी गुंतवणूकदारांना (Multibagger Return) मालामाल मात्र केलं आहे.

ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग अँड असेंबली आणि टाटा टिनप्लेट अशी या शेअर्सची नावं आहेत. या दोन्ही शेअर्नं गुंतवणूकदारांना वर्षभराच्या कालावधीत मोठे रिटर्न दिले आहेत.

टाटा समुहाच्या हा स्टॉक ९१० टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे. वर्षभरापूर्वी १२ मार्च २०२१ रोजी ऑटोमोटिव्ह स्टँपिंग अँड असेंबलीचा शेअर ३७.५० रुपयांवर बंद झाला होता. परंतु ११ मार्च २०२२ रोजी हा शेअर ३७८.८० रुपयांवर बंद झाला.

या दरम्यान या शेअरनं ९१०.१३ टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये कंपनीचा शेअर ५६.७० रुपयांवरून वाढून ३७८.८० रुपयांवर गेला. या कालावधीत कंपनीच्या शेअर नं ५६८.०८ टक्क्यांचा रिटर्न दिला.

जर कोणत्याही व्यक्तीनं १२ महिन्यांपूर्वी या कंपनीमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर त्याच्या १ लाखांचं मूल्य आज १०.१० लाख रुपयांपेक्षा अधिक झालं असतं. तर सहा महिन्यांमध्ये याचं मूल्य ६.६८ लाख रुपये झालं असतं.

ऑटो सहाय्यक फर्म प्रामुख्यानं टाटा मोटर्ससाठी शीट मेटल स्टँपिंग, वेल्डेड असेंबली आणि पॅसेंजर आणि कमर्शिअल गाड्यांसाठी मॉड्युल बनवते. याशिवाय ही कंपनी जनरल मोटर्स इंडिया, फिएट इंडिया, पियाजिओ, अशोक लेलँड, जेसीबी, टाटा हिताची आणि एमजी मोटर्ससारख्या कंपन्यांना आपल्या प्रोडक्ट्सची विक्री करते.

तर दुसरीकडे टाटा टिनप्लेटचा (Tata Tinplate) शेअर एका वर्षापूर्वी १८ मार्च २०२१ रोजी १५६.२० रुपयांवर बंद झाला होता. तर ११ मार्च २०२२ रोजी त्याचं क्लोझिंग ३६८.३५ रुपयांवर झालं. यादरम्यान या स्टॉकनं १३५.८२ टक्क्यांचा रिटर्न दिला. पाच वर्षांतहा शेअर ८१.४० रुपयांनी वाढून ३६८.३५ रूपयांवर पोहोचला.

जर कोणत्याही व्यक्तीनं एका वर्षापूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर त्याचं मूल्य आज २.३५ लाख रुपये असतं. तर पाच वर्षांपूर्वी ही रक्कम गुंतवली असती तर त्याचं मूल्य आज ४.५२ लाख रुपये असतं.

भारताची टिनप्लेट कंपनी (TCIL) टिनप्लेटची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. देशातील पहिली टिनप्ले उत्पादक कंपनी टीसीआयएल १९२० मध्ये सुरू झाली. ही कट शीट आणि कॉईल फॉर्ममध्ये टिनप्लेट आणि शीट फॉर्ममध्ये टिन फ्री स्टील पुरवण्याचं काम करते. या कंपनीचे दोन प्रमुख प्रोडक्ट टिनप्लेट आणि टीएफएस आहे, जे प्रोसेस्ड फुडचं पॅकेजिंगचं काम करतात.