TATA Group : टाटा समूह खरेदी करतंय 'या' कंपनीतील हिस्सा; वृत्तानंतर गुंतवणूकदारांची झाली चांदी By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 08:31 PM 2022-04-04T20:31:15+5:30 2022-04-04T20:40:07+5:30
TATA Group Tejas Networks Ltd Stock: सोमवारीही या शेअरमध्ये 5 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स सोमवारी जवळपास 23 रुपयांनी वाढून 470.45 रुपयांवर बंद झाले. वास्तविक या वाढीमागे दोन मोठी कारणे आहेत. जाणून घेऊया सविस्तर. TATA Group Tejas Networks Ltd Stock: तेजस नेटवर्क्स लिमिटेड (Tejas Networks Ltd) या टाटा समूहातील (Tata group) कंपनीचे शेअर्स सध्यात तेजीत दिसत आहेत. तेजस नेटवर्कच्या शेअरला (Tejas Networks share) गेल्या चार ट्रेडिंग सेशन्समध्ये अपर सर्किट लागल्याचं दिसून येत आहे.
सोमवारीही या शेअरमध्ये 5 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स सोमवारी जवळपास 23 रुपयांनी वाढून 470.45 रुपयांवर बंद झाले आहेत. वास्तविक या वाढीमागे दोन मोठी कारणे आहेत.
पहिलं कारण म्हणजे तेजस नेटवर्क्सने गेल्या आठवड्यात सेमीकंडक्टर कंपनी सांख्य लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडमधील 64.40 टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली होती. हा करार सुमारे 283.94 कोटी रुपयांचा आहे.
पुढील 90 दिवसांमध्ये हे अधिग्रहण पूर्ण होणार आहे. याशिवाय तेजस नेटवर्कला मेड इन इंडिया 5G रोल आउटचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. यामुळेच या कंपनीच्या शेअर्सची सातत्यानं खरेदी होत आहे.
तेजसचे शेअर्स शेअर बाजारातील दिग्गज विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट आहेत. बाजार तज्ञांच्या मते, कंपनी सांख्य लॅब्सचे अधिग्रहण करून 5G ORAN, 5G सेल्युलर ब्रॉडकास्ट आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन उत्पादने आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये जोडून आपला व्यवसाय वाढवू शकते.
यामुळे भारतातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ग्राहकांच्या संख्येतही वाढ होईल. सांख्य लॅब्सच्या नावावर 73 आंतरराष्ट्रीय पेटंट आहेत, त्यापैकी 41 आधीच मंजूर झाले आहेत. दरम्यान, तेजसची पुढील काही वर्षांमध्ये एक टॉप ग्लोबल टेलिकॉम कंपनी बनण्याची इच्छा आहे.
सोमवारी कामकाजादरम्यान तेजस नेटवर्कचा शेअर 5 टक्क्यांनी वाढून 468.40 रुपयांवर पोहोचला. दरम्यान हे दर त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या जवळ आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर्सची किंमत 23.09 टक्क्यांनी वाढली आहे.
तर दुसरीकडे हा स्टॉक महिन्याभराच्या कालावधीत 23.95 टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षी आतापर्यंत स्टॉक 10.19 टक्क्यांनी वाढला आहे. दुसरीकडे, सांख्य लॅबच्या स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे, कंपनीचा शेअर सोमवारी 4.92 टक्क्यांच्या वाढीसह 6.18 रुपयांवर बंद झाला.