गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं! TATA ग्रुपचा मालामाल करणारा 'हा' शेअर आता करतोय कंगाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 02:01 PM2022-04-18T14:01:27+5:302022-04-18T14:10:35+5:30

फक्त तीन वर्षांतच 5872 टक्के परतावा देणारा हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा कंगाल करू लागला आहे...

टाटा ग्रुपमधील एका कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात छप्परफाड परतावा देत. एक लाख रुपयांचे जवळपास 15 लाख रुपये केले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे, या स्टॉकने फक्त तीन वर्षांतच तब्बल 5872 टक्के एवढा परतावा दिला होता.

फक्त तीन वर्षांतच 5872 टक्के परतावा देणाऱ्या या शेअरचा भाव एका वर्षात 10.45 रुपयांवरून तब्बल 290.15 रुपयांवर गेला होता. मात्र, आता हाच स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा कंगाल करू लागला आहे.

टाटा ग्रुपच्या या कंपनीचे नाव आहे, टाटा टेलीसर्व्हिसेज लि. (TTML). या कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी पैसे गुंतवले ते मालामाल झाले आहेत. पण, ज्या गुंतवणूकदारांनी एक आठवडा अथवा गेल्या तीन महिन्यांपूर्वी पैसे गुंतवले आहेत, ते आता कंगाल होत आहेत.

या शेअर्समध्ये नुकतेच पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे एका आठवड्यात 11.68 टक्क्यांनी कमी झाले आहेत. तसेच तीन महिन्यांचा विचार करता त्यांचा पैसा 22 टक्क्यांनी कमी झाला आहे. आज या स्टॉकमध्ये केवळ विकणारेच दिसत आहेत.

आज टीटीएमएलमध्ये लोअर सर्किट लागले आहे. तसेच हा स्टॉक 5 टक्क्यांनी घसरून 176.20 रुपयांवर आला आहे. गेल्या एका वर्षात टीटीएमएलने 1387 टक्यांचा परतावा दिला आहे.

गेल्या एक वर्षापूर्वी या शेअर्समध्ये ज्याने कुणी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, त्याचे 14 लाख 86000 रुपये झाले असतील. कारण, एक वर्षापूर्वी या शेअरची किंमत 10.45 रुपये एवढी होती.

टीटीएमएलचा शेअर 11 जानेवारीला आपल्या ऑल टाइम हायवर म्हणजेच, 290.15 रुपयांवर पोहोचला होता.