TATA च्या ‘या’ कंपनीची भन्नाट कामगिरी! वर्षभरात दिले १६८ टक्के रिटर्न; शेअर ठरला सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 06:39 PM2022-02-08T18:39:53+5:302022-02-08T18:46:08+5:30

टाटांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये चांगलेच चढ-उतार पाहायला मिळाले. मात्र, तरीही काही कंपन्यांनी दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले. यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे.

TATA ग्रुपमधील अनेक कंपन्या भारतीय बाजारपेठेसह शेअर मार्केटमध्येही आपल्या कामगिरीचा आलेख चढाच ठेवताना दिसत आहेत. टाटावरील गुंतवणूकदारांचा विश्वास अनेकपटींनी वाढल्याचे दिसत आहे. यामुळेच कंपन्यांचे प्रदर्शनही उत्तम होत आहे.

TATA ग्रुपमधील टाटा एलक्सी लिमिटेड (Tata Elxsi) ही एक आयटी सॉफ्टवेअर उत्पादने कंपनी आहे. टाटा समूहातील या कंपनीने अवघ्या एका वर्षात भागधारकांना अपवादात्मक रिटर्न दिले आहेत. लार्ज-कॅप श्रेणीमध्ये अस्तित्वातील काही कंपन्यांनी इतका उच्च परतावा दिला आहे.

अलीकडे कंपनी तिच्या डिसेंबरच्या तिमाही निकालांसाठी सज्ज आहे आणि त्यामुळेच शेअरचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तो ५२ आठवड्यांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. त्यामुळेच हा शेअर आता सर्वांच्याच नजरेत भरत आहे.

गेल्या वर्षभरात या कंपनीने १६८ टक्के रिटर्न दिल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक बाबींचा विचार करता कंपनी तिच्या तिमाही कामगिरीत सातत्यपूर्ण राखून आहे. डिसेंबर २०२१ ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने ६३५.४० कोटी रुपयांची निव्वळ विक्री गाठली आहे.

तिमाही आधारावर ६.७ टक्के आणि वार्षिक आधारावर ३३.१८ टक्के वाढली. त्याचा EBITDA २०९ कोटी रुपयांवर आहे. तो पुन्हा अनुक्रमे १३.८ टक्के आणि वार्षिक ४५.६ टक्के वाढला.

निव्वळ नफ्याने प्रथमच रु. १५० कोटींची पातळी ओलांडून रु. १५१ कोटी गाठली. गेल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीने २०.४४ टक्के आणि ४३.५ टक्के वार्षिक वाढ नोंदवली. कंपनी उत्तम तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करेल, अशी अपेक्षा शेअरधारकांना होती.

पुढे जाऊन कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगली तिमाही कामगिरी नोंदविल्यामुळे शेअर मूल्यतेजीला आणखी चालना मिळाली. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७,९४९ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक रु. २,५४४.८० आहे.

टाटा एलक्सी ही वाहतूक, माध्यम, दळणवळण आणि आरोग्यनिगा तसेच वैद्यकीय उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रात आरेखन नेतृत्वाखालील तंत्रज्ञान सेवांमध्ये गुंतलेली आघाडीची तंत्रज्ञान कंपनी आहे.