Tata समुहाच्या 'या' कंपन्या रिलायन्सला देणार टक्कर! 5 वर्षात 90 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:16 AM 2023-02-13T11:16:46+5:30 2023-02-13T11:19:47+5:30
सध्या जगभरात मंदीचे सावट असून, अनेक कंपन्यांनी कामगारांची मोठी कपात केली आहे. पण, दुसरीकडे देशातील सर्वात मोठा ग्रुप असलेल्या टाटा समुह विक्रमी वाटचाल करत आहे. सध्या जगभरात मंदीचे सावट असून, अनेक कंपन्यांनी कामगारांची मोठी कपात केली आहे. पण, दुसरीकडे देशातील सर्वात मोठा ग्रुप असलेल्या टाटा समुह विक्रमी वाटचाल करत आहे. या आर्थिक वर्षात समूहाच्या लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्या 20 टक्क्यांच्या दराने वाढत आहेत.
टाटा समूहाने आपल्या जुन्या आणि नवीन व्यवसायात पुढील पाच वर्षात 90 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे. कंपनीच्या नवीन व्यवसायांमध्ये ईव्ही, बॅटरी, रिन्युएबल, 5जी, प्रिसिजन इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर यांचा समावेश आहे.
'लवकरच टाटा स्टील आणि टाटा मोटर्सचे मार्केट कॅप समूहाच्या आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या बरोबरीने पोहोचेल, असं टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले. यामुळे पुढील काळात आता उद्योगपती मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला टाटा समूहाच्या तीन कंपन्यांशी स्पर्धा करावी लागू शकते. सध्या रिलायन्स ही 1,580,700.16 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.
एका मुलाखतीमध्ये टाटा समुहाच्या चंद्रशेखरन यांनी माहिती दिली. 'टाटा समूहावर अनेकदा टीसीएस या आयटी कंपनीवर अवलंबून असल्याची टीका केली जाते. मात्र लवकरच ही परिस्थिती बदलणार आहे. "मला आशा आहे की लवकरच टाटा स्टील आणि टाटा मोटर्स टीसीएसशी स्पर्धा करण्याच्या स्थितीत येतील, असंही चंद्रशेखरन म्हणाले.
TCS चे मार्केट कॅप 12.94 लाख कोटी रुपये आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. टाटा स्टीलचे मार्केट कॅप 1.32 लाख कोटी रुपये आहे आणि टाटा मोटर्सचे मार्केट कॅप 1.60 लाख कोटी रुपये आहे. या दोन्ही कंपन्यांचा महसूल टीसीएसपेक्षा जास्त असला तरी. टाटा मोटर्सचा महसूल 3.01 लाख कोटी रुपये, टाटा स्टीलचा महसूल 2.45 लाख कोटी रुपये आणि टीसीएसचा महसूल 1.96 लाख कोटी रुपये आहे.
'सर्व समुह कंपन्या मजबूत वाढ नोंदवत आहेत आणि 2022-23 मध्ये त्यांची वार्षिक वाढ सुमारे 20 टक्के असेल असा अंदाज आहे. टाटासारख्या मोठ्या समूहासाठी हे काम खूप चांगले म्हणता येईल, असंही चंद्रशेखरन म्हणाले.
'समूहाचा एकत्रित नफा आणि रोख प्रवाह खूप मजबूत आहे. पारंपारिक व्यवसायात समूहाने आपले लक्ष्य गाठले याचा आम्हाला आनंद आहे. या कंपन्या त्यांच्या अंतर्गत संसाधनांमधून स्वतःला निधी देतील. आमची पुढील पाच वर्षात ९० अब्ज डॉलरची गुंतवणूक योजना आहे. कंपन्या टाटा पॉवर आणि टाटा स्टीलमध्ये प्रत्येकी 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. त्याचप्रमाणे टाटा मोटर्स आणि जग्वार लँड रोव्हर पुढील पाच वर्षांत 25 अब्ज डॉलरची गुंतवणूक करतील' , असा विश्वास चंद्रशखरन यांनी व्यक्त केली.
'एअर इंडियामध्येही मोठी गुंतवणूक केली जाईल. यामध्ये समूहाच्या सर्व विमान कंपन्यांचा समावेश असेल. एअर एशिया, विस्तारा, एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर इंडियाचे विलीनीकरण मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
टाटा समुह एअर इंडियाला वळण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नवीन व्यवसायातही गुंतवणूक केली जाईल, असंही चंद्रशेखरन म्हणाले. EV, बॅटरीज, रिन्युएबल, 5G, प्रेसिजन इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर. ब्रिटनमधील तोट्यात चाललेल्या स्टील युनिटचे भवितव्यही येत्या काही दिवसांत ठरवले जाणार आहे. टाटा सन्स फक्त अतिरिक्त निधीच्या बाबतीत नैतिक समर्थन देत आहे, असंही टाटा समुहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन म्हणाले.