Tata Motors Launch First Electric Car Tata Tigor EV In India
'टाटा'ची पहिली इलेक्ट्रिक कार Tigor EV झाली लॉन्च; किंमत आहे... By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 02:07 PM2019-06-28T14:07:21+5:302019-06-28T14:10:50+5:30Join usJoin usNext टाटा मोटर्सकडून पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आली आहे. टाटाने Tigor EV नावाने इलेक्ट्रिक कार व्हर्जन लॉन्च केलं आहे. यात 16.2 KWH बॅटरी लावली असून पूर्ण चार्जिंगवर ही गाडी 142 किमी अंतर पार करु शकणार आहे. तर टाटा मोटर्सकडून 3 वर्षाची वॉरंटीही देण्यात आली आहे. टाटा Tigor EV या गाडीची एक्स शोरुम किंमत आहे. 9.99 लाख रुपये. टाटाने Tigor चे दोन वेगवेगळे व्हर्जन लॉन्च केलेत. यात XM आणि XT व्हर्जन आहे. XM ची किंमत 9.99 लाख रुपये आहे तर XT ची किंमत 10.90 लाख रुपये आहे. तसेच सबसिडीची किंमत या रक्कमेत समाविष्ट करण्यात आली आहे. टाटा Tigor EV फक्त ऑपरेटर्स, टॅक्सी बायर्ससाठी उपलब्ध होणार आहे. सध्या खाजगी चालक ही गाडी खरेदी करु शकणार नाही. या गाडीमध्ये Climate Control, Power Window, Bluetooh Conectivity सोबतच ऑडिओ सिस्टम, हाईट एडजस्टेबल ड्रायव्हर सीट अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. टिगोर ईवीमध्ये 72V, 3 फेजची एसी इंडक्शन मोटर दिली आहे. टाटा मोटर्सचा दावा आहे की, टिगोर अवघ्या 12 सेकंदात 0 ते 60 किमी प्रति तास वेग पकडू शकते याची टॉप स्पीड 80 किमी प्रतितास आहे. कारचं वजन 1516 किलोग्राम आहे. इलेक्ट्रिक मोटरला 16.2 KWH बॅटरी पॉवर देण्यात आली आहे. एकदा ही गाडी पूर्ण चार्ज झाली तर 142 किमी अंतर पार करु शकते. तर साधारण 6 तासात 80 टक्के मोटार चार्ज होते. टिगोर ईवी कार सफेद, निळा आणि सिल्वर रंगात उपलब्ध होणार आहे. यात डुअल फ्रंट एअरबॅग्स, पार्किंग सेंसरसारखे फिचर मिळणार आहे. कंपनीने बॅटरी पॅकसोबत तीन वर्ष आणि 1 लाख 25 हजार किमी वॉरंटी दिली आहे. टॅग्स :इलेक्ट्रिक कारकारElectric Carcar