Tata च्या वर्षभराच्या प्लॅनवर होणार 3 हजारांची बचत, मिळणार 500 Mbps चा Internet Speed

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 06:23 PM2022-04-21T18:23:38+5:302022-04-21T18:34:12+5:30

पाहा जिओ आणि टाटा पैकी कोणता प्लॅन आहे तुमच्यासाठी बेस्ट

टाटा प्ले (Tata Play) आणि जिओ (Jio) त्यांच्या ग्राहकांसाठी 500 Mbps चे हाय-स्पीड ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करतात. कोरोना महासाथीच्या काळात अनेकांनी वर्क फ्रॉम होम सुरू केलं. यानंतर हाय-स्पीड इंटरनेटची मागणी खूप वाढली आहे.

यामुळेच प्रत्येक कंपनी स्वतःचे हाय-स्पीड इंटरनेट प्लॅन्स आणत आहे. पण इथे आम्ही तुमच्यासाठी टाटा प्ले आणि जिओ फायबरच्या 500 एमबीपीएस प्लॅन्सची तुलना करत आहोत. तर पाहूया कोणता प्लॅन आहे तुमच्यासाठी सर्वोत्तम.

Tata Sky ने अलीकडेच त्यांचं नाव बदलून Tata Play Fiber केले आहे. कंपनीनं नावात बदल केला असला तरी कोणत्याही प्लॅनमध्ये मात्र बदल करण्यात आलेला नाही. Tata Play Fiber चा अनलिमिटेड 500 Mbps चा प्लॅनसाठी तुम्हाला महिन्याला 2,300 रुपये खर्च करावे लागतील. ग्राहकांना हा प्लॅन दीर्घ मुदतीसाठी देखील मिळू शकेल. कारण कंपनी निरनिराळ्या वैधता कालावधीसाठी 500 एमबीपीएस प्लॅन ऑफर करते.

तीन महिन्यांच्या कालावधीसाठी, ग्राहकांना हा प्लॅन 6,900 रुपयांमध्ये मिळू शकतो. सहा महिन्यांच्या वैधतेच्या कालावधीसाठी प्लॅनची ​​किंमत 12,900 रुपये आहे. यावर ग्राहकांच्या 900 रुपयांची बचत होते.

तर एका वर्षाच्या कालावधीसाठी प्लॅनची ​​किंमत 24,600 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांच्या 3000 रुपयांची बचत होते. ग्राहकांना या ब्रॉडबँड प्लॅनसह 3300GB किंवा 3.3TB फेअर यूसेज पॉलिसी (FUP) डेटा मिळतो. परंतु यानंर वेग 3 Mbps पर्यंत कमी होतो.

जिओ फायबरचाही एक प्लॅन 500 Mbps स्पीडच्या पॅकसह येतो. तसंच यामध्ये आणखी अनेक ऑफर्स दिल्या जातात. जिओचा हा प्लॅन 2,499 रुपये महिना किंमतीवर उपलब्ध आहे.

या व्यतिरिक्त, जिओ एकूण 17 OTT सबस्क्रिप्शन ऑफर करते ज्यात Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar आणि इतर तेरा अॅप्सचा ॲक्सेसचा समावेश आहे. या प्लॅनसोबत येणारी Amazon Prime Video ची वैधता एका वर्षाची आहे. रिलायन्स जिओच्या अधिकृत वेबसाइटवरून वापरकर्ते हा प्लॅन अॅक्सेस करू शकतात.