TATA Power AGM: TATA च्या 'या' कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचं नशीब उजळणार! चेअरमननं शेअर केला संपूर्ण प्लॅन By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 10:10 AM 2022-07-08T10:10:06+5:30 2022-07-08T10:21:37+5:30
या स्टॉकची किंमत सध्या 214.50 रुपये एवढी आहे. येत्या काही दिवसांत हा स्टॉक आणखी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञही या शेअरबाबत उत्साही असून, खरेदीचा सल्ला देत आहेत. जर आपण शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. सध्या टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये (Tata Power Stock) गुंतवणूक केल्यास, आपल्याला भविष्यात बंपर परतावा मिळू शकतो. या स्टॉकची किंमत सध्या 214.50 रुपये एवढी आहे. येत्या काही दिवसांत हा स्टॉक आणखी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञही या शेअरबाबत उत्साही असून, खरेदीचा सल्ला देत आहेत.
विजेचे उत्पादन 30,000 मेगावॅट करण्याचे लक्ष्य - येणाऱ्या पाच वर्षांत अक्षय ऊर्जा क्षेत्रात (Renewable Energy) 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा टाटा पॉवरचा (Tata Power) प्लॅन असून, या कालावधीमध्ये आपली वीज निर्मिती क्षमता 30,000 मेगावॅटपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. यातील अर्धे उत्पादन हे स्वच्छ उर्जा स्त्रोतांपासून केले जाईल.
सध्या टाटा पॉवरची उत्पादन क्षमता 13,500 मेगावॅट एवढी आहे. अर्थात येत्या पाच वर्षांत ती दुप्पट करण्याचा प्लॅन आहे. यात अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वाटा तब्बल 34 टक्के एवढा आहे.
कंपनीच्या चेअरमननं सांगितला भविष्यातील प्लॅन - येणाऱ्या 5 वर्षांत अक्षय ऊर्जा क्षेत्रात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची आमची योजना आहे, असे टाटा पॉवरचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन (Natarajan Chandrasekaran) यांनी कंपनीच्या एजीएममध्ये अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभेत (Annual General Meeting) सांगितले. ते एका भागधारकाने कंपनीच्या भविष्यातील योजनेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. याशिवाय, 2026-27 पर्यंत उत्पादन क्षमता 30,000 मेगावॅटपर्यंत नेण्याची टाटा पावर (Tata Power) की योजना असल्याचे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षात 14 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष - याशिवाय, 2027 पर्यंत कंपनीचा स्वच्छ ऊर्जा पोर्टफोलियो वाढून 60 टक्के होईल, जो सध्या 34 टक्के एवढा आहे. ही क्षमता वाढून 2030 पर्यंत 80 टक्के करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
चंद्रशेखरन म्हणाले, चालू आर्थिक वर्षात एकूण 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा कंपनीचा मानस आहे. यातील 10,000 कोटी रुपये अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवले जातील. टाटा पॉवरने 2021-22 मध्ये 707 मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता वाढविली आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात? बाजारातील तज्ज्ञ टाटा पॉवरच्या शेअरबाबत उत्साही असून खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. तज्ज्ञांनी टाटा पॉवरची टार्गेट प्राईस 250 रुपये एवढी ठेवली आहे. म्हणजेच त्यात सध्याच्या किमतीपेक्षा 18 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
या शेअरने 7 एप्रिल, 2022 आणि 28 जुलै, 2021 रोजी 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 298 रुपयांवर, तर निच्चांकी पातळी 118.40 रुपयांवर होता. येणाऱ्या काळात या शेअरमध्ये तेजी येईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
(टीप - येथे केवळ शेअर संदर्भात माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)