Tax Saving Tips: अखेरच्या क्षणी करा टॅक्स वाचवणारी गुंतवणूक, कुठे वाचेल टॅक्स, किती मिळेल लाभ, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 07:18 PM 2022-03-26T19:18:32+5:30 2022-03-26T19:29:27+5:30
Tax Saving Tips: २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा चालू आहे. चालू आर्थिक वर्ष अखेरच्या टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी गुंतवणूक आणि टॅक्स सेव्हिंगसंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर हे काम ३१ मार्चच्या आधी करावे लागेल. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा चालू आहे. चालू आर्थिक वर्ष अखेरच्या टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी गुंतवणूक आणि टॅक्स सेव्हिंगसंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर हे काम ३१ मार्चच्या आधी करावे लागेल. मात्र टॅक्स वाचवण्याच्या घाई गडबडीत चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करता कामा नये. त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक केली पाहिजे.
गुंतवणुकीचा विचार केल्यास कर वाचवण्यासाठी या टॅक्स सेव्हिंग स्कीम्स पॉझिटिव्ह रिटर्न देतात. सेव्हिंग बँक अकाऊंटवर इंट्रेस्ट रेट ४ टक्क्यांच्या आसपास आहे. तर सरासरी महागाई ५ टक्क्यांच्या पुढे आहे. अशा परिस्थितीत सेव्हिंगमध्ये ठेवलेला पैसा निरेटिव्ह रिटर्न देत आहे. पॉझिटिव्ह रिटर्नसाठी अशा ठिकाणी गुंतवणूक करावी लागेल जिथून ५-६ टक्क्यांपेक्षा अधिकचा वार्षिक रिटर्न मिळेल. तेव्हाच गुंतवणूकदाराला फायदा मिळेल.
गुंतवणुकीसाठी ELSS (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम) उत्तम स्कीम आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यावर सेक्शन ८०सीच्या अंतर्गत डिडक्शनचा लाभ मिळतो. ज्याची लिमिट १.५ लाख रुपये आहे. त्याचा लॉक पिरियड ३ वर्षांचा आहे. फायनान्शियल एक्सपर्ट यामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणुकीचा सल्ला देतात. त्यामुळे कम्पाऊंडिंगच लाभ मिळू शकतो. ELSS चा पैसा हा शेअर बाजारामध्ये गुंतवला जातो. त्यामुळे चांगले रिटर्न मिळतात. चालू आर्थिक वर्षातील केवळ ५ दिवस उरले आहेत, अशा परिस्थितीत सेक्शन ८०सी ची मर्यादा पूर्ण करण्यासाठी एकरकमी गुंतवणूक केली जाऊ शकते.
पीपीएफचा विचार केल्यास यामध्ये गुंतवणूक केल्यावर सेक्शन ८०सी अंतर्गत सवलत मिळते. या काळात पीपीएफवर ७.१ टक्क्यांचा इंट्रेस्ट मिळतो. आणि इंट्रेस्ट इन्कम पूर्णपणे टॅक्स फ्री असते. १५ वर्षांमध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचे अकाऊंट मॅच्युअर होते. यामध्ये किमान ५०० रुपयांची गुंतवणूक करू शकता. पीपीएफमधील गुंतवणुकीवर पूर्णपणे सरकारची हमी आहे. यामध्ये जोखीम ही नगण्य आहे.
ULIPयूएलआयपी म्हणजे युनिट लिंक्ड इन्शोरन्स प्लानमध्येही गुंतवणूक केल्यावर तुम्हाला लाईफ इन्शोरन्ससह इक्विटीमध्ये गुंतवणुकीचा लाभही मिळतो. गुंतवणुकीचा काही भाग मिळतो. गुंतवणुकीतील काही भाग हा गुंतवणुकीसाठी आणि इतर इक्विटीमध्ये जमा केला जातो. त्यामुळे तुम्हाला रिटर्नसुद्धा मिळतो. याचा हेतू वेल्थ क्रिएशनसोबत लाईफ कव्हर देणे हाही असतो. युलिप प्लॅनवर मॅच्युरिटी ही पूर्णपणे टॅक्स फ्री असते.
नॅशनल पेमेंट सिस्टिम हा निवृत्तीसाठी उत्तम पर्याय आहे. ही एक सोशल सिक्युरिटी स्किम आहे. ज्यामध्ये सरकारी, खासगी आणि असंघटीत क्षेत्रातील कामगार सहभागी होऊ शकतात. यामध्ये वार्षिक ८ ते १० टक्के रिटर्न मिळतो. एनपीएस मध्ये गुंतवणूक केल्यावर सेक्शन ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांचा लाभ मिळतो. सेक्शन ८०सीसीडी(१बी) अंतर्गत ५० हजार रुपयांचा अतिरिक्त कर सवलत मिळते. त्यावरील एकूण डिडक्शन हे २ लाख रुपये एवढे आहे. ६० वर्षे पूर्ण झाल्यावर कॉर्प्सच्या ६० टक्के रक्कम काढता येते. तर ६० टक्के रक्कम काढता येते. ती पूर्णपणे टॅक्स फ्री असते. यातील ४० टक्के रकमेवरून पेन्शन मिळत राहते. एनपीएसअंतर्गत इक्विटीमध्ये बहुतांश ५० टक्के गुंतवणूक केली जाते.