अंबानी परिवाराने नाही तर यांनीही लग्नात कोट्यवधी खर्च केलेत; भारतातील सर्वांत महागडे विवाहसोहळे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:46 AM2024-07-17T11:46:55+5:302024-07-17T11:58:12+5:30

भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चट यांची मुलगी राधिका यांचा शाही विवाह नुकताच संपन्न झाला.

भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चट यांची मुलगी राधिका यांचा शाही विवाह नुकताच संपन्न झाला. देश-विदेशातील सर्व सेलिब्रिटींनी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यावर जवळपास ५००० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. भारतात आणखीही असे काही विवाह झाले ज्यावर वारेमाप खर्च करण्यात आला.

१२ डिसेंबर २०१८ रोजी मुकेश आणि नीता अंबानी यांची एकुलती एक कन्या इशाचा आनंद पिरामल यांच्यासोबत झालेला विवाहसोहळाही लक्षवेधी ठरला होता, इशाने लग्नात ९० कोटी रुपयांचा लेहंगा घातला होता. या सोहळ्यावर ७०० कोटी रुपये खर्च झाल्याचं समजतं.

२००४ मध्ये दिवंगत उद्योगपती सुब्रतो रॉय यांचा मुलगा सुशांतोचं रिचासोबत, तर सुमांतोचं चांतणीसोबत लग्न झालं, ११ हजार पाहुण्यांनी या सोहळ्याला 3 हजेरी लावली होती.

२०१३ मध्ये प्रमोद मित्तल यांची कन्या सृष्टीचा विवाह इन्व्हेस्टमेंट बँकर गुलराज बहल यांच्यासोबत झाला. स्पेनमध्ये तीन दिवस पार पडलेल्या या विवाहावर ५०० • कोटी रुपये खर्च झाले.

२०१५ मध्ये संजय हिंदुजा यांनी त्यांची गर्लफ्रेंड अनु महतानीसोबत विवाह केला. उदयपूर येथे पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्यावर एकूण १५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

२०१६ मध्ये राजकीय नेते गली जनार्दन रेडी यांची मुलगी ब्राह्मणीचा विवाह राजीव रेड्डी यांच्यासोबत झाला. या विवाह सोहळ्यावर ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले.

२०१७ मध्ये ऑस्ट्रिया येथे स्टॅलियन ग्रुप फाउंडर सुनील वासवानी यांची मुलगी सोनमचा नवीन फाबियानी यांच्यासोबत विवाह झाला. यावर २१० कोटी रुपये खर्च केला गेला.

२०१७ मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटलीमध्ये विवाहबद्ध झाले. विरुष्का म्हणून लोकप्रिय असलेल्या जोडीच्या लग्नावर १०० कोटी रुपयांचा खर्च झाला.