स्पॅम कॉलचा त्रास होईल कमी, व्हॉट्सअपने आणलंय नवं फिचर By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 10:01 AM 2023-03-06T10:01:22+5:30 2023-03-06T10:09:00+5:30
आपल्या युजर्संसाठी या कंपन्या नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात. त्यासोबतच, युजर्संचा डेटा सुरक्षित ठेवणे आणि युजर्सं फ्रेंडली पद्धतीने कंपन्यांकडून काम होत असते. प्रसिद्ध सोशल मीडिया एप आणि सर्वाधिक युजर्सं संख्या असलेल्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या फिचर्समध्ये सातत्याने अपडेट होत असते.
आपल्या युजर्संसाठी या कंपन्या नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात. त्यासोबतच, युजर्संचा डेटा सुरक्षित ठेवणे आणि युजर्सं फ्रेंडली पद्धतीने कंपन्यांकडून काम होत असते.
व्हॉट्सअपवर गेल्या काही दिवसांपासून फेक कॉल आणि मेसेजचा युजर्संना मोठा त्रास होतोय. आता, कंपनीने या त्रासापासून युजर्संची सुटका केलीय.
व्हॉट्सअपकडून एक नवीन फिचर आणण्यात येत आहे. जे कुठल्याही अनोखळी नंबरसाठी म्युट कॉलची सेवा देतंय. या नवीन फिचरद्वारे अनोळखी नंबरवरुन आलेल्या कॉलला म्युट केले जाऊ शकते.
तुमच्या कॉन्टॅक्ट लीस्टमधील कुठल्याही अनोळखी नंबरवरुन या फिचरद्वारे कॉल म्युट केला जाऊ शकेल. गेल्या काही वर्षात स्मॅप कॉलिंगमध्ये वाढ झाल्याने कंपनीने हे नवीन फिचर आणले आहे.
व्हॉट्सअपकडून प्रथमच अनोळखी नंबरला ब्लॉक करण्याची सुविधा देण्यात येत आहे. मात्र, म्युट कॉल फीचर एक एडिशनल सेफ्टी फिचर देण्यात आलंय.
अकाऊंट बॅन होणे वाचवण्यासाठी व्हॉट्सअपने प्लॅटफॉर्म युजर्संसाठी एक प्रोटोकॉल शेअर केलाय. म्हणजे जर तुम्ही कोणाला ब्लॉक करु शकत नसाल तर, तो कॉल म्युट करण्याचा पर्याय युजर्संला मिळणार आहे.
WABetaInfo नुसार नवीन फीचर आता Android साठी WhatsApp बीटा पर डेवलप करण्यात येत आहे. त्यासोबतच, व्हॉट्सअपद्वारे एक नवीन फिचर देण्यात येणार आहे.
व्हॉट्सअप टॅबलेट्ससाठी हे नवं फिचर काम करण्यात येणार असून स्प्लिट व्यू असं याच नाव आहे. त्याद्वारे, मल्टीटास्कींग अतिशय सहज आणि सुलभ होणार आहे.