एका बातमीचा परिणाम...! हा ₹3 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 02:47 PM 2024-07-21T14:47:16+5:30 2024-07-21T15:00:46+5:30
आज आम्ही आपल्याला अशाच एका स्टॉकसंदर्भात माहिती देणार आहोत. ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच जबरदस्त परतावा दिला आहे. शेअर बाजारातील पेनी स्टॉक्स हे सर्वसाधारणपणे धोकादायक मानले जातात. मात्र, यातील काही स्टॉक्स चांगला परतावादेखील देऊन जातात. आज आम्ही आपल्याला अशाच एका स्टॉकसंदर्भात माहिती देणार आहोत. ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच जबरदस्त परतावा दिला आहे.
हा शेअर आहे सुमीत इंडस्ट्रीज लिमिटेडचा (Sumeet Industries Ltd share). या कर्जात अडकलेल्या टेक्सटाइल कंपनीचा शेअर गेल्या शुक्रवारी बीएसईवर 20% पर्यंत वधारला आणि 3 रुपयांवर बंद झाला. शेअरमध्येही तेजी एका बातमीनेमुळे आली आहे. खरे तर, ही कंपनी दिवाळखोर होत असून ईगल ग्रुप तिला टेकओव्हर करेल.
कंपनीचा शेअर - सुमीत इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर बीएसईवर 20% ने वाढून 3 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या एका महिन्यात हा शेअर 45% पर्यंत वधारला आहे. तर सहा मिहिन्यांत या शेअरमध्ये 25% ची घसरण आली आहे. तसेच या वर्षात YTD मध्ये हा शेअर 35% पर्यंत घसरला आहे.
तसेच वर्षभराचा विचार करता या शेअरमध्ये 18% ची तेजी आली आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5.25 रुपये तर नीचांक 1.90 रुपये एवढा आहे. तर कंपनीचे मार्केट कॅप 31.09 कोटी रुपये एवढे आहे.
पेनी स्टॉक म्हणजे काय? - ज्या स्टॉकची किंमत अत्यंत कमी असते, त्यांना पेनी स्टॉक्स म्हटले जाते. अशा स्टॉकची किंमत साधारणपणे 20 रुपये प्रति शेअर पेक्षाही कमी असते आणि त्यांचे मार्केट कॅपही कमी असते.
सुमीत इंडस्ट्रीज लिमिटेडला आधी सुमीत सिंथेटिक्स नावानेही ओळखले जात होता. 1 ऑगस्ट 1988 रोजी एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत तिचे रुपांतर करण्यात आले. यानंतर 1 फेब्रुवारी 1992 रोजी पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये तिचे रुपांतर करण्यात आले. राजकुमार सोमानी हे या कंपनीचे मॅनॅजिंग डायरेक्टर आहेत. तर शंकरलाल सोमानी हे चेअरमन आहेत
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)