जगज्जेत्या गुंतवणूकदाराला कशाची चाहूल लागली...! वॉरेन बफेंनी उरलेली संपत्ती कुठे खर्च होणार, हे ही सांगितले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 18:00 IST2025-01-12T17:38:01+5:302025-01-12T18:00:08+5:30
Warren Buffett Property will: जगात आठ अब्ज लोक आहेत. पण आपली मुले या लोकांतील सर्वात भाग्यवान आहेत, असे बफे यांनी म्हटले आहे.

जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी आपल्या संपत्तीच्या वाटणीचा नवा प्लॅन सांगितला आहे. वॉल स्ट्रीस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांची संपत्ती एका नव्या चॅरिटेबल ट्रस्टला दिली जाणार आहे. आधीच्या त्यांच्या निर्णयानुसार आताची त्यांची घोषणा पूर्णपणे वेगळी आहे.
वॉरेन बफे यांना तीन मुले आहेत. सूसी, हॉवी आणि पीटर. हे तिघेही मिळून ती ट्रस्ट चालविणार आहेत. हे पैसे कसे वापरायचे हे तिघेही मिळून ठरविणार आहेत. यासाठी बफे यांनी आपल्या मुलांना काही दिशा दर्शविल्या आहेत. जगात आठ अब्ज लोक आहेत. पण त्यांची मुले या लोकांतील सर्वात भाग्यवान आहेत, असे बफे यांनी म्हटले आहे.
आपण हा निर्णय बफेंनी नीट विचार करून घेतला असल्याचे सांगितले. मुलांनी त्यांच्या त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून चांगल्या कामांसाठी आवड दाखविली आहे. हे फाऊंडेशन मुलांचे शिक्षण, खाणे, मानवी तस्करी आणि आदिवासींच्या हक्काच्या मुद्दयांवर काम करत आहे. या अनुभव त्यांना ट्रस्टचा पैसा वापरण्यासाठी तसेच कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी होणार असल्याचा विश्वास बफेंनी व्यक्त केला.
बफे यांनी बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनला काहीही दान न करण्याचा निर्णय घेतला आहे. २००६ पासून बफे यांनी या फाऊंडेशनला ३९ अब्ज डॉलर दान केले आहेत. परंतू, माझ्या निधनानंतर या फाऊंडेशनला कोणतेही दान दिले जाणार नाही, असे म्हटले आहे.
बफे यांनी त्यांच्या संपत्तीपैकी बहुतांश संपत्ती बिल गेट्ससारख्या संस्थांना दान केलेली आहे. काही संपत्ती उरलेली आहे. ती त्यांनी आपल्या मुलांना परोपकारी कामांना वापरण्यासाठी सोडली आहे. या संपत्तीचे काय होणार हे अद्याप अनिश्चित होते, त्यावर आता प्रकाश पडला आहे.
मी जमिनीच्या सहा फूट खालून आता काही करू शकेन असे वाटत नाही, असेही बफे यांनी गंमतीने म्हटले आहे. एकंदरीतच ९४ वर्षीय बफे यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागलेली आहे. मुलांनीही बफे यांनी नियोजित केलेले काम पुढे नेण्यासाठी वचनबद्ध असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.