जगातील पहिली फोल्डेबल सायकल; आनंद महिंद्रा प्रेमात, सांगितली खासीयत By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 11:33 AM 2023-10-22T11:33:13+5:30 2023-10-22T12:13:40+5:30
उद्योगपती आनंद महिंद्रा हे महिंद्रा कंपनीचे प्रमुख असल्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योग जगातात सर्वपरिचित आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचा असलेला सक्रीय सहभाग त्यांना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत घेऊन गेला आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा हे महिंद्रा कंपनीचे प्रमुख असल्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योग जगातात सर्वपरिचित आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचा असलेला सक्रीय सहभाग त्यांना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत घेऊन गेला आहे.
त्यामुळेच, त्यांचे ट्विट किंवा त्यांच्या ट्विटरवरील अनेक पोस्ट ह्या सर्वसामान्य नागरिकांना भावणाऱ्या असतात. अनेकदा थेट सामान्य माणसांसोबतही त्यांच्या पोस्टचा संबंध येतो. आता, आनंद महिंद्रा यांनी एका फोल्डेबल सायकलचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे ही फोल्डेबल सायकल आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहे.
आता, आनंद महिंद्रा यांनी एका फोल्डेबल सायकलचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे ही फोल्डेबल सायकल आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहे.
आनंद महिंद्रा यांनी स्वत: या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत बोल्डेबल ई-बाईक (सायकल) बनवणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. आयआयटी बॉम्बेच्या काही विद्यार्थ्यांनी पुन्हा आमचा सन्मान वाढवला आहे.
त्यांनी फुलसाईज व्हील्सची जगातील पहिली फोल्डेबल दुचाकी निर्माण केली आहे. डायमंड फ्रेम ही ई-बाईक म्हणजे नवा अविष्कारच आहे. ही दुचाकी इतर फोल्डेबल बाईकच्या तुलनेनं ३५ टक्के प्रभावी आहे.
त्याशिवाय मध्यम ते हायस्पीडवरही ही बाईक स्थीर राहते. विशेष म्हणजे ही एकमात्र दुचाकी (सायकल) अशी आहे, जी फोल्ड केल्यानंतर तिला उचलून न्यावे लागत नाही, अशी माहिती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
ऑफिस परिसरात फिरण्यासाठी ही फोल्डेबल दुचाकी हॉर्नबॅक X1 आपण खरेदी केली आहे. हॉर्नबॅक X1 बाईक अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, ट्विटरवरुन महिंद्रा यांनी काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, भगव्या आणि काळ्या रंगाची ही बाईक दिसून येते. ती बाईक फोल्ड केल्याचेही दिसत आहे.
आनंद महिंद्रा यांनी या बाईकवरुन फेरफटका मारल्याचे फोटोत दिसत आहे. तसेच, फेरफटका मारल्यानंतर फोल्ड करुन आपल्या चारचाकी गाडीत ठेवतानाही दिसून येतात.