There are other benefits to filing an ITR!
आयटीआर भरण्यामागील इतरही आहेत फायदे! By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 03:04 PM2021-08-27T15:04:48+5:302021-08-27T15:19:04+5:30Join usJoin usNext ITR : तुमच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून आयटीआर उपयुक्त ठरते. मुंबई : ज्यांना प्राप्तिकर लागतो, त्यांच्यासाठी प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरणे बंधनकारक आहे. तथापि, आयटीआरचा एवढाच उपयोग नाही. इतरही अनेक बाबतीत आयटीआर उपयुक्त आहे. त्याविषयी जाणून घेऊया. उत्पन्नाचा पुरावा : बँका अथवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेताना तुमच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून आयटीआर उपयुक्त ठरते. पत्त्याचा पुरावा : आयटीआर हा तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणूनही ग्राह्य धरला जातो. व्हिसासाठी उपयुक्त : व्हिसा देण्यासाठी अनेक देश आयटीआर मागतात. करविषयक नियम पाळणारी व्यक्ती म्हणून तुमची प्रतिमा आयटीआरमुळे तयार होते. प्राप्तिकर परताव्यासाठी उपयुक्त : मुदत ठेवीसारख्या बचत साधनांवर लागलेल्या प्राप्तिकराचा परतावा आयटीआरमुळे तुम्हाला मिळू शकतो. इतरही कर देयता त्यामुळे कमी होते. तोटा ‘कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी उपयुक्त : व्यवसायात तोटा झाल्यास त्याचा दावा करण्यास आयटीआर उपयुक्त ठरते. तोटा ‘कॅरी फारवर्ड’ करून भांडवली लाभातून सवलत मिळविण्यासाठी आयटीआर दाखल केलेला असणे आवश्यक आहे. कर्ज घेण्यासाठी उपयुक्त : कर्ज देताना बँका आयटीआर पाहतात. तो तुमच्या उत्पन्नाचा पुरावाच असतो. आयटीआरमुळे तुम्हाला झटपट कर्ज मिळू शकते.टॅग्स :व्यवसायकरइन्कम टॅक्सbusinessTaxIncome Tax