या आहेत दरमहा सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला सीईओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 01:24 PM2019-08-07T13:24:48+5:302019-08-07T13:47:20+5:30

गेल्या काही काळात विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी मोठी झेप घेतली आहे. अनेक कंपन्यांमध्ये महिला आज उच्च पदावर आहेत. गतवर्षी वॉल स्ट्रीट जर्नलने सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला सीईओंची यादी तयार केली होती. आज आपण जाणून घेऊया सर्वाधिक कमाई करणाऱ्या अशा महिला सीईओंविषयी.

जनरल मोटर्सच्या सीईओ मॅरी बॅर्रा या 2018 मध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओ होत्या. त्यांचे वार्षिक उत्पन्न 149.7 कोटी रुपये एवढे होते.

लॉकहेड मार्टिन या प्रसिद्ध अमेरिकन कंपनीत काम करणाऱ्या मार्लिन ह्युसन या सर्वांधिक पगार घेणाऱ्या महिलांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची 2018 मधील कमाई सुमारे 146.99 कोटी इतकी होती.

जनरल डायनेमिक्स कंपनीतील फॆबे नोव्हाकोव्हिक या सर्वाधिक पगार घेणाऱ्या महिलांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची वार्षिक कमाई 141.52 कोटी आहे.

आयबीएम कंपनीच्या सीईओ व्हर्जिनिया यांचा वार्षिक कमाई 120.33 कोटी आहे. त्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.

नॅसडेक कंपनीत सीईओ असलेल्या एडेना फ्रेडमॅन या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न 98.45 कोटी रुपये आहे.