These countries have the most gold in the world How much stock does India have
जगातील या देशांकडे आहे सर्वात जास्त सोनं; भारताकडे किती साठा? By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 05:31 PM2024-01-19T17:31:03+5:302024-01-19T17:34:49+5:30Join usJoin usNext जगातील अनेक देशांकडे सोन्याचा साठा आहे. जगातील अनेक देशांकडे सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. ज्या देशांकडे सोन्याचा साठा जास्त असतो तो देश श्रीमंत मानला जातो. अमेरिका- जगात सर्वाधिक सोने अमेरिकेकडे आहे. फोर्ब्सने तयार केलेल्या यादीत ८,१३६.४६ टन साठ्यासह अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. जर्मनी: युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश जर्मनी सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत फक्त अमेरिकेच्या मागे आहे. जर्मनीकडे ३,३५२.६५ टन सोन्याचा साठा आहे. इटली- सोन्याच्या साठ्यात इटली मागे नाही, इटली जगात तिसऱ्या स्थानावर आहे. फोर्ब्सनुसार, या देशाजवळ २,४५१.८४ टन सोन्याचा साठा आहे. फ्रान्स - चौथ्या क्रमांकावर एक युरोपीय देशही आहे. फ्रान्सकडे २,४३६.८८ टन सोन्याचा साठा आहे. रशिया- जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असलेल्या रशियाकडे २,३३२.७४ टन सोन्याचा साठा आहे. या प्रचंड साठ्यासह रशिया पाचव्या स्थानावर आहे. चीन- चीन सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत सहाव्या स्थानावर आहे. चीनकडे सध्या २,१९१.५३ टन सोन्याचा साठा आहे. स्वित्झर्लंड-सोन्याच्या साठ्याबाबत स्वित्झर्लंड सातव्या क्रमांकावर आहे. या युरोपीय देशाकडे १,०४० टन सोन्याचा साठा आहे. जपान- आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि जगातील पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या जपानकडे ८४५.९७ टन सोन्याचा साठा आहे. भारत- सोन्याच्या साठ्यात भारत अजूनही खूप मागे आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, भारताकडे सध्या ८००.७८ टन सोन्याचा साठा आहे, भारत सोन्याच्या बाबतीत नवव्या क्रमांकावर आहे.टॅग्स :सोनंचांदीGoldSilver