१ जानेवारीपासून होणार हे महत्त्वाचे बदल, तुमच्यावर होईल थेट परिणाम, पाहा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 04:48 PM2022-12-25T16:48:08+5:302022-12-25T16:51:31+5:30

changes from January 1 : नव्या वर्षामध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. त्यांचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर होणार आहे. यामध्ये बँक लॉकरपासून ते गाडी खरेदी करण्यासंदर्भातील बदलांचा समावेश आहे. पुढच्या महिन्यातील १ तारखेपासून लागू होणारे हे कोणते बदल आहेत, त्यांचा आढावा पुढीलप्रमाणे.

नव्या वर्षामध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. त्यांचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर होणार आहे. यामध्ये बँक लॉकरपासून ते गाडी खरेदी करण्यासंदर्भातील बदलांचा समावेश आहे. पुढच्या महिन्यातील १ तारखेपासून लागू होणारे हे कोणते बदल आहेत, त्यांचा आढावा पुढीलप्रमाणे.

१ जानेवारीपासून ५ मोठे बदल होऊ घातले आहेत. यामधील एक बदल आहे. गाड्यांच्या किमतींमध्ये होणारी वाढ. मारुती सुझुकी, हुंडाई मोटा, टाटा मोटर्स, मर्सिडिझ बेंझ, ऑडी, रेनॉल्ड, किआ इंडिया आणि एमजी मोटर यांच्या कारच्या किमतींमध्ये १ जानेवारी २०२३ पासून वाढ होणार आहे.

नव्या वर्षांत होणारा दुसरा बदल हा बँक लॉकरसंदर्भातील आहे. तुम्हाला १ जानेवारीपासून बँक लॉकरचा वापर करण्यासाठी तुम्ही नव्या लॉकर करारावर सह्या केल्या आहेत की नाही हे पाहावे लागेल.

त्याशिवाय काही बँक क्रेडिट कार्डशी संबंधित नियमसुद्धा बदलणार आहेत. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड्स पॉईंट आणि फी स्ट्रक्चरमध्ये बदल करणार आहे. तसेच एसबीआयने आपल्या SimplyCLICK कार्डहोल्डर्ससाठी काही नियम बदलले आहेत.

१ जानेवारीपासून जीएसटीच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. ५ कोटींपेक्षा अधिकचा वार्षिक टर्नओव्हर करणाऱ्या व्यावसायिकांना आता इ इनव्हाअस बनवणे आवश्यक असेल.

त्यामध्ये फोन संबंधित एका बदलाचा समावेश आहे. १ तारखेपासून प्रत्येक फोन निर्माता आणि त्याची आयात आणि निर्यात करणाऱ्या कंपनीसाठी प्रत्येक फोनच्या आयएमईए नंबरचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे.