1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम, जाणून घ्या काय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 01:39 PM2022-07-27T13:39:38+5:302022-07-27T13:47:16+5:30

काही दिवसांतच आता ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. १ ऑगस्टपासून रोख व्यवहारांशी संबंधित नियम बदलणार आहेत. नेमके कोणते नियम बदलणार आणि तुमच्यावर त्याचा थेट काय परिणाम होणार हे जाणून घेऊ...

काही दिवसांतच आता ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. १ ऑगस्टपासून रोख व्यवहारांशी संबंधित नियम बदलणार आहेत. नेमके कोणते नियम बदलणार आणि तुमच्यावर त्याचा थेट काय परिणाम होणार हे जाणून घेऊ...

का बदलला आहे नियम? फसवणुकीला आळा घालण्यासाठी २०२० मध्ये चेक पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टमची सुरुवात करण्यात आली होती. याच्याद्वारे ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या चेकसाठी काही महत्त्वाची माहिती द्यावी लागते.

बँका १८ दिवस बंद ऑगस्ट महिन्यात एकूण १८ दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयने ऑगस्टमध्ये आपल्या यादीत अनेक दिवस बँक बंद असल्याची माहिती दिली आहे. ऑगस्टमध्ये मोहरम, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी असे अनेक सण आहेत. ज्या दिवशी बँकांचं कामकाज चालणार नाही.

गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महाग? दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलिंडरच्या किमती निश्चित होत असतात. १ ऑगस्ट रोजी सरकारी तेल कंपन्या गॅस सिलिंडरचा दर निश्चित करतील. गेल्या वेळी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ पाहायला मिळाली होती. त्यामुळे देशभरात गॅसच्या किमती १०५० च्या पुढे गेल्या आहेत.

चेकचे नियम बँक ऑफ बडोदाचे चेक पेमेंटचे नियम १ ऑगस्टपासून बदलणार आहेत. १ ऑगस्टपासून ५ लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्यात आली आहे.

याअंतर्गत चेक जारी करणाऱ्याला चेकशी संबंधित माहिती एसएमएस, नेट बँकिंग किंवा मोबाइल ॲपद्वारे बँकेला द्यावी लागेल. त्यानंतरच चेक क्लिअर होईल. जर कोणताही चेक जारी करायचा असेल तर त्याचा क्रमांक, देयकाची रक्कम आणि प्राप्तकर्त्याचे नाव यासह अनेक तपशील बँकेला प्रदान करावे लागतील.