TATA समुहाच्या या दोन स्टॉक्सनं मिनिटांत केलं गुंतवणूकदारांना मालामाल; झुनझुनवालांना १८६ कोटींचा फायदा By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 08:37 PM 2022-02-15T20:37:07+5:30 2022-02-15T20:43:08+5:30
शेअर बाजाराच्या मंगळवारच्या सकारात्मक सुरुवातीत बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Big Bull Rakesh Jhunjhunwala) यांना मोठा फायदा झाला. Rakesh jhunjhunwala portfolio stocks: सलग दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर मंगळवारी सेन्सेक्स-निफ्टी ग्रीन झोनमध्ये उघडले. भारतीय शेअर बाजाराच्या या सकारात्मक सुरुवातीत बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Big Bull Rakesh Jhunjhunwala) यांना मोठा फायदा झाला.
राकेश झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीत बाजार उघडण्याच्या 10 मिनिटांत 186 कोटी रुपयांची वाढ झाली. टाटा समूहाच्या टायटनच्या शेअर्सनं (Titan Shares) आणि टाटा मोटर्सच्या शेअर्स (Tata Motors) त्यांना फायदा मिळवून दिला. हे दोन्ही स्टॉक राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट आहेत.
टायटन स्टॉकची किंमत सोमवारी NSE वर 2398 रुपयांवर बंद झाली, तर मंगळवारी सकाळी 9:25 वाजता प्रति शेअर 2435 रुपयांवर गेली होती. शेअर बाजार उघडल्यानंतर 10 मिनिटांत प्रति शेअर किंमत 37 रुपयांनी वाढली. तर अखेरच्या सत्रात टायटनचे शेअर्स 2499.60 रुपयांवर बंद झाले.
याच प्रकारे झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोतील टाटा मोटर्सचे शेअरची (Tata Motors Stock) किंमत सुरूवातीच्या सत्रात वाढली. हा शेअर सकाळच्या सत्रात 9.25 वाजता 471.25 रुपयांवर पोहोचला. तर बाजार बंद होताना या शेअरची किंमत 503 रुपयांवर पोहोचली.
ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या तिमाहीतील टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची कंपनीत गुंतवणूक आहे.
राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 3,57,10,395 शेअर्स आहेत, तर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 95,40,575 शेअर्स आहेत.
याचा अर्थ राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीत 5.09 टक्के हिस्सा आहे. त्याचप्रमाणे Q3FY22 साठी टाटा मोटर्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवरून असे दिसून येते की राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्सचा कंपनीमध्ये 1.18 टक्के हिस्सा आहे.
आज बाजार उघडल्यानंतर ते बंद होण्याच्या कालावधीत टायटनच्या शेअरचा विचार केला तर झुनझुनवाला यांच्या संपत्तीत अंदाजे 170 कोटी रुपयांपेक्षा अधिकची वाढ झाली. तर टाटा मोटर्सच्या शेअरनं त्यांच्या संपत्तीत एकूण 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढ केली.