याला म्हणतात बंपर परतावा! केवळ 4 महिन्यांत ₹75 चा शेअर ₹400 वर पोहोचला, गुंतवणूकदारांची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 09:05 PM2023-12-04T21:05:06+5:302023-12-04T21:12:37+5:30

या शेअरने गेल्या 4 महिन्यांत 455 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

स्मॉलकॅप कंपनी बोंडाडा इंजिनिअरिंगने केवळ 4 महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांना मालालमाल केले आहे. साधारणपणे 4 महिन्यांपूर्वी 75 रुपये किंमतीचा बोंडाडा इंजिनिअरिंगचा आयपीओ आला होता आणि आता 4 डिसेंबर 2023 रोजी कंपनीचा शेअर 400 रुपयांवर पोहोचला आहे.

या शेअरने गेल्या 4 महिन्यांत 455 टक्क्यांचा परतावा दिला आहे. बोंडाडा इंजिनिअरिंगच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 464.70 रुपये एवढा आहे. तसेच, कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 142.50 रुपये एवढा आहे.

75 रुपयांच्या फिक्स्ड प्राइसवर आला होता IPO - बोंडाडा इंजिनिअरिंगचा आयपीओ 18 ऑगस्ट 2023 रोजी 75 रुपयांच्या किंमतीवर आला होता. तो 22 ऑगस्टपर्यंत खुला होता. कंपनीचा शेअर 30 ऑगस्टला 142.50 रुपयांवर होता.

लिस्टिंगनंतर, कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे. हा शेअर 4 डिसेंबर 2023 रोजी 406.85 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 2 महिन्यांचा विचार करता या शेअरने 127 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

कंपनीला सातत्याने मिळतायत ऑर्डर - बोंडाडा इंजिनिअरिंगला सातत्याने मोठ्या ऑर्डर मिळत आहेत. कंपनीला गेल्या काही दिवसांपूर्वीच पेस डिजीटेक इंफ्रा प्रायव्हेट लिमिटेडकडून 20.18 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहेत. नोव्हेंबर महिन्यात भारती एयरटेलकडूनही या कंपनीला ऑर्डर मिळाली आहे.

याशिवाय, या कंपनीला दिनेश इंजिनिअर्स लिमिटेडकडून नोव्हेंबर महिन्यात 32.72 कोटी रुपयांची, तर सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडून कंपनीला 34.35 कोटी रुपयांची, ऑर्डर मिळाली आहे.

बोंडाडा इंजिनिअरिंगची सुरुवात 2012 मध्ये झाली आहे. बोंडाडा इंजिनिअरिंग, टेलिकॉम आणि सोलर एनर्जी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना इंजिनिअरिंग, प्रेक्योरमेंट अँड कंस्ट्रक्शन (EPC) आणि ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स सर्व्हिसेस उपलब्ध करून देते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)