याला म्हणतात पैशांचा पाऊस! 19 पैशांच्या शेअरनं ₹1 लाखचे केले ₹1 कोटी; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 12:40 AM2024-07-10T00:40:27+5:302024-07-10T00:48:27+5:30

या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४४.९२ रुपये तर नीचांक १४.६३ रुपये एवढा आहे.

फार्मा कंपनी रेमेडियम लाइफकेअरचा शेअर मंगळवारी कामकाजादरम्यान फोकसमध्ये होता. तो इंट्रा डेमध्ये ४.४% ने वधारून २०.७९ रुपयांवर पोहोचला. एका बातमीमुळे या शेअरमध्ये ही वृद्धी आली आहे.

रेमेडियम लाइफकेअरने क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) आणि बोनस इक्विटी शेअरच्या अॅलॉटमेंटच्या माध्यमाने निधी उभारण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एक्सचेन्ज फायलिंगच्या माध्यमाने यासंदर्भात माहिती दिली.

काय म्हणते कंपनी? - एक्सचेन्ज फायलिंगमध्ये सांगण्यात आले आहे की, "क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) किंवा इतर पद्धतींद्वारे एक किंवा अधिक टप्प्यात 200 कोटी रुपयांचा निधी उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे." याशिवाय, बोर्डाने 3:1 या रेशोत पूर्ण पेड बोनस इक्विटी शेअर्सच्या रूपात 1 रुपये फेस व्हॅल्यूच्या 30,24,00,000 इक्विटी शेअर्सच्या अॅलॉटमेंटला मंजुरी दिली आहे. कंपनीने 6 जुलैला रेकॉर्ड डेट निश्चित केली होती.

शेअर्सची स्थिती - रेमेडियम लाइफकेअरच्या शेअरमध्ये गेल्या एका वर्षात जवळपास 48 टक्क्यांची वाढ झाली आहे. या शेअरने केवळ दोन वर्षांत 1,470 टक्क्यांचा तर तीन वर्षांत 1,875 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

पाच वर्षांचा विचार करता या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10,500 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. पाच वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 19 पैसे एवढी होती. अर्थात या कालावधीत या शेअरने एक लाख रुपयांचे 1 कोटी रुपयांहूनही अधिक केले आहेत.

या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४४.९२ रुपये तर नीचांक १४.६३ रुपये एवढा आहे. तर कंपनीचे मार्केट कॅप 762.45 कोटी रुपये एवढे आहे.

रेमेडियम लाइफकेअर ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे. हिचे मार्केट कॅप ७६२.४५ कोटी रुपये एवढे आहे. हैदराबादमध्ये असलेली ही कंपनी प्रगत फार्मास्युटिकल इंटरमीडिएट्स, API आणि इतर फार्मा उत्पादनांच्या व्यवसायात सक्रिय.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)