याला म्हणतात परतावा! हे आहेत करोडपती बनवणारे 12 स्टॉक! किंमत ₹1 पेक्षाही कमी, ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 05:46 PM 2023-04-10T17:46:48+5:30 2023-04-10T17:55:45+5:30
खरे तर असे स्टॉक्स अत्यंत धोकादायक असतात. पण असा एकच दर्जेदार स्टॉक दीर्घकाळात आपले नशीब बदलू शकतो. तर जाणून घेऊयात कोट्यधीश बनवणाऱ्या अशाच काही स्टॉक्ससंदर्भात... शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या माध्यमाने गुंतवणूकदार मालामालही होऊ शकतात. पण त्या गुंतवणूकदाराने योग्य वेळी योग्य स्टॉक निवडणे आवश्यक आहे. आज आम्ही आपल्याला अशाच काही मायक्रो-कॅप स्टॉक्स संदर्भात सांगणा आहोत. ज्यांत गुंतवणूक करून गुंतवणूकदार कोट्यधीश बनले आहेत.
खरे तर असे स्टॉक्स अत्यंत धोकादायक असतात. पण असा एकच दर्जेदार स्टॉक दीर्घकाळात आपले नशीब बदलू शकतो. तर जाणून घेऊयात कोट्यधीश बनवणाऱ्या अशाच काही स्टॉक्ससंदर्भात...
कधी काळी 1 रुपयांवर होती किंमत - शेअर बाजारातील आकडेवारीनुसार, एप्रिल 2013 मध्ये, किमान 12 शेअर्स असे आहेत, ज्यांची किंमत 1 रुपयापेक्षाही कमी होती. या शेअर्समध्ये गेल्या 10 वर्षांत 208 पट वाढ झाली आहे. यांपैकी शुक्र फार्मास्युटिकल्स लि.ने गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा दिला आहे.
शुक्र फार्मास्युटिकल्स लि.चा शेअर दहा वर्षांत 20,744 टक्क्यांनी वधारला आहे. या कंपनीचा शेअर एप्रिल 2013 मध्ये केवळ 0.25 पैशांना होता तो 6 एप्रिल 2023 रोजी 52.93 रुपयांपर्यंत गेले आहे. या काळात 1,00,000 रुपयांची गुंतवणूक 2 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
शुक्र फार्मास्युटिकल्सनंतर राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी सर्वाधिक परतावा दिला आहे. या कंपनीचा शेअर एप्रिल 2013 मध्ये 0.82 टक्क्यांवरून 6 एप्रिल 2023 रोजी 7,338 टक्क्यांच्या वाढीसह 60.99 रुपयांवर पोहोचला आहे.
यानंतर ट्रायडंटच्या शेअरने 3,225 टक्क्यांचा परतावा दिला आहे. इक्विप सोशल इम्पॅक्ट टेक्नॉलॉजीजच्या शेअरने 2,990 टक्क्यांचा परतावा दला आहे. XT ग्लोबल इन्फोटेकने 2,923 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर मिड इंडिया इंडस्ट्रीजच्या शेअरने 2,375 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
खरे तर, बाजारावर लक्ष असलेले लोक पेनी स्टॉकच्या बाबतीत अत्यंत सावध राहतात. तसेच गुंतवणूकदारांना सल्ला देतात की, त्यांनी चांगले प्रमोटर्स, स्केलेबल बिझनेस मॉडेल आणि कंपन्यांवर तुमच्या सहकाऱ्यांच्या तुलनेत काही कॉम्पिटिटिव्ह नफ्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.
या शेअर्समध्येही जबरदस्त तेजी - काही इतर कंपन्यांच्या शेअर्सनेही गेल्या 10 वर्षांत बम्पर परतावा दिला आहे. यांत अॅड्रोइट इन्फोटेक, राधे डेव्हलपर्स (इंडिया), Bampsl सिक्योरिटीज, विस्टा फार्मास्युटिकल्स, डुकॉन इंफ्राटेक्नोलॉजीज आणि बीएलएस इन्फोटेकच्या शेअर्सचा समावेश आहे.
या सर्व शेअर्सनी 1000 टक्क्यांपासून ते 2,268 टक्क्यांपर्यंतची उसळी घेतली आहे. यांच्या तुलनेत, याच काळात बेंचमार्क इक्विटी इंडेक्स बीएसई सेंसेक्स 225 टक्के वाढला आहे. तसेच बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप सारख्या व्यापक निर्देशांक अनुक्रमे 297 टक्के आणि 369 टक्क्यांनी वाढला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)