याला म्हणतात परतावा! TATA समूहाच्या शेअरची भरारी, 5 दिवसांत 756 कोटींनी वाढली झुनझुनवालांची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 04:28 PM2023-11-22T16:28:50+5:302023-11-22T16:41:55+5:30

गेल्या 5 दिवसांत टायटनच्या शेअरने 150 रुपयांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे...

टाटा समूहाची कंपनी असलेल्या टायटनच्या शेअरमध्ये जबरद्स्त तेजी आली आहे. टायटनच्या शेअर्सने बुधवारी नवा विक्रम नोंदवला आहे. कंपनीच्या समभागांनी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली आहे. टायटनचा शेअर बुधवारी 3429.20 रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या 5 दिवसांत टायटनच्या शेअरने 150 रुपयांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांना या वाढीचा मोठा फायदा झाला आहे. यामुळे, झुनझुनवाला यांच्या संपत्तीत अवघ्या 5 दिवसांत 700 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

5 दिवसांत अशी वाढली झुनझुनवाला यांची संपत्ती - टायटनच्या सप्टेंबर 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 47695970 शेअर होते. कंपनीमध्ये त्यांचा वाटा 5.37 टक्के एवढा आहे.

टायटनचा शेअर 16 नोव्हेंबर 2023 रोजी 3270.55 रुपयांवर होता. तो 22 नोव्हेंबर 2023 रोजी 3429.20 रुपयांवर पोहोचला. गेल्या 5 दिवसांत टायटनच्या शेअरने 158.65 रुपयांची उसळी घेतली आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 47695970 शेअर आहेत. या हिशेबाने 5 दिवसांत त्यांची संपत्ती 756 कोटी रुपयांनी वाढली आहे.

3 वर्षांत टायटनच्या शेअरमध्ये 150 टक्क्यांची तेजी - टायटनच्या शेअर्समध्ये गेल्या 3 वर्षांत 150 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. टायटनचा शेअर 20 नोव्हेंबर 2020 रोजी 1364.95 रुपयांवर होता. तो 22 नोव्हेंबर 2023 रोजी 3429.20 रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या 10 वर्षांसंदर्भात बोलायचे झाल्यास, टायटनच्या शेअरमध्ये जवळपास 1397 टक्क्यांची उसळी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर 29 नोव्हेंबर 2013 रोजी 229 रुपयांवर होता. टायटनचा शेअर 22 नोव्हेंबर 2023 रोजी 3429.20 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2268.90 रुपये एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)