याला म्हणतात शेअर! ₹4 च्या स्टॉकवर तुटून पडले गुंतवणूकदार, सलग 6 महिन्यांपासून देतोय बंपर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 01:18 AM2024-02-16T01:18:16+5:302024-02-16T01:26:31+5:30

डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे.

शेअर बाजारात प्रचंड चढ-उताराचे वातावरण असतानाच बीएलएस इन्फोटेक, या आयटी क्षेत्राशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी जबरदस्त तेजी दिसून आली. डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे.

आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी बीएलएस इन्फोटेकच्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून बडले होते. व्यवहाराच्या शेवटी, या शेअरला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आणि तो 4.03 रुपयांवर बंद झाला. 12 फेब्रुवारीला हा शेअर 4.69 रुपयांवर पोहोचला होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.

BLS इंफोटेकने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा नेट प्रॉफीट 0.01 कोटी रुपये एवढा आहे. डिसेंबर 2022 ला संपलेल्या गत तिमाही दरम्यान कुठल्याही प्रकारचा नेट प्रॉफिट/लॉस नोंदवण्यात आलेला नाही.

डिसेंबर तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नसंदर्भात बोलायचे झाल्यास, प्रवर्तकांकडे 59.11 टक्के एवढी हिस्सेदारी आहे. याशिवाय सार्वजनिक शेअरहोल्डिंग 40.89 टक्के एवढी आहे.

प्रवर्तकासंदर्भात बोलायचे झाल्यास, सुशील कुमार सरोगी यांच्याकडे 1,11,14,438 शेअर्स आहेत. ही 2.54 टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय प्रवर्तक ग्रुपकडे कंपनीचे 56.57 टक्के शेअर्स आहेत.

ही खासगी क्षेत्रातील कंपनी 1985 साली अस्तित्वात आली असून संगणक सॉफ्टवेअर सुविधा पुरवते. ही कंपनी कोलकात्यातील आहे. या कंपनीच्या शेअरने बीएसई इंडेक्सवर एका आठवड्याच्या कालावधीत मंद परतावा दिला असला तरी 2 आठवड्यात गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.

या शेअरने एका महिन्याचा कालावधीतही जवळपास 30 टक्के परतावा दिला आहे. तसेच, तीन आणि सहा महिन्यांच्या कालावधीत अनुक्रमे 90 टक्के आणि 140 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)