याला म्हणतात स्टॉक...! ₹7 वरून ₹200 वर पोहोचला भाव; लोकांना केलं मालामाल, अजय देवगनकडेही 10 लाख शेअर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 18:15 IST2025-02-23T17:51:19+5:302025-02-23T18:15:20+5:30
या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. महत्वाचे म्हणजे, या शेअरमध्ये बॉलीवुड स्टार अजय देवगनचीही गुंतवणूक आहे...

भारतीय शेअर बाजरात अनेक कंपन्या लिस्टेड आहेत. यांतील बऱ्याच कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत.
या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. महत्वाचे म्हणजे, या शेअरमध्ये बॉलीवुड स्टार अजय देवगनचीही गुंतवणूक आहे. हा शेअर आहे पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनलचा.
पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनलचा शेअर गेल्या शुक्रवारी व्यवहारादरम्यान 10% पर्यंत वधारून 199.50 रुपयांवर पोहोचला. बॉलीवुड स्टार अजय देवगनची कंपनीत गुंतवणूक आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 1,400 कोटी रुपये एवढे आहे.
अजय देवगनजवळ 10 लाख शेअर्स - पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल हे चित्रपट निर्मिती, वितरण आणि प्रदर्शनाशी संबंधित एक मोठे नाव आहे. पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनलने दृश्यम, द डिप्लोमॅट सारखे चित्रपट तयार केले आहेत. या कंपनीत अजय देवगणची १० लाख शेअर्ससह १.४१ टक्के एवढी हिस्सेदारी आहे.
पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनलचा शेअर आता १० रुपयांवरून सुमारे २०० रुपयांपर्यंत वाधारला आहे. अर्थात या शेअरवे आपल्या गुंतवणूकदारांना २७०० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
जर एखाद्याने ५ वर्षांपूर्वी, म्हणजेच २४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रति शेअर ७.२२ रुपयांवर होता तेव्हा, या शेअरमध्ये १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज तिचे २.७ लाख रुपये झाले असते.
कंपनीचा शेअर - बीएसई अॅनालिटिक्सनुसार, गेल्या एका आठवड्यात कंपनीचा शेअर १२.५ टक्क्यांनी वधारला आहे. तर गेल्या एका वर्षात ३४ टक्क्यांनी वधारला आहे. या शेअरने गेल्या दोन वर्षांत ६०० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
गेल्या तीन वर्षांचा विचार करता, हा शेअर १५९० टक्क्यांनी वधारला आहे. तर गेल्या ५ वर्षांत, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल २५०० टक्क्यांचा परतावा दिला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)