LIC च्या या पॉलिसीची 15 दिवसांतच धूम, मॅच्युरिटीवर मिळेल खात्रीशीर परतावा; जाणून घ्या खरेदीचा परफेक्ट टाईम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 07:46 PM2023-05-07T19:46:11+5:302023-05-07T19:56:03+5:30

लॉन्च झाल्यानंतर केवळ 15 दिवसांतच तब्बल 50,000 पॉलिसींची विक्री...!

देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) सर्व वयोगटातील लोकांसाठी पॉलिसी आहेत. देशातील कोट्यवधी लोकांनी एलआयसीच्या पॉलिसींमध्ये गुंतवणूक केली आहे. या वर्षी म्हणजे 2023 मध्ये, LIC ची एक खास पॉलिसी लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत आहे.

या पॉलिसीचे नाव आहे, 'जीवन आझाद पॉलिसी' (Jeevan Azad Policy). लॉन्च झाल्यानंतर केवळ 15 दिवसांतच तब्बल 50,000 जीवन आझाद पॉलिसी विकल्या गेल्या आहेत. ही एक नॉन पार्टिसिपेटिंग वामा स्कीम आहे.

मॅच्युरिटीवर खात्रीशीर परतावा - जीवन आझाद पॉलिसीमध्ये प्रीमियम भरण्याची मुदत मायनस 8 वर्षं आहे. समजा, एखादा गुंतवणूकदाराने पॉलिसीचा 18 वर्षांचा पर्याय निवडला, तर त्याला केवळ 10 वर्षांसाठी (18-8) प्रीमियम भरावा लागेल. ही पॉलिसी मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम देण्याची खात्री देते. या पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम 2 लाख रुपये आणि कमाल विमा रक्कम पाच लाख रुपये एवढी आहे.

पॉलिसी खरेदीचे वय - कुणीही व्यक्ती 15 ते 20 वर्षांसाठी जीवन आझाद पॉलिसी घेऊ शकते. 90 दिवस ते 50 वर्षं वयोगटातील व्यक्ती या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकते. जीवन आझाद पॉलिसी मॅच्युर झाल्यानंतर, गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावा मिळतो. ही पॉलिसी घेण्यासाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे.

18, 19 आणि 20 वर्षांचा प्लॅन तीन महिने अर्थात 90 दिवसांच्या मुलासाठी घेतला जाऊ शकतो. याशिवाय, 16 वर्षांचा प्लॅन दोन वर्षांच्या वयापासून ते 50 वर्षांपर्यंतची व्यक्ती घेऊ शकते. तसेच, 15 वर्षांची पॉलिसी तीन वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंची व्यक्ती घेऊ शकते.

समजा, एखाद्या 30 वर्षांच्या व्यक्तीने 18 वर्षांसाठी जीवन आझाद पॉलिसी घेतली. तर ती व्यक्ती दोन लाख रुपयांच्या विम्याच्या रकमेसाठी 12,038 रुपये, 10 वर्षांपर्यंतच जमा करेल.

नॉमिनीची सुविधा - जर एखाद्या पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर पॉलिसी घेताना निवडलेली 'मूळ विमा रक्कम' अथवा वार्षिक प्रीमियम च्या 7 पट पेसै नॉमिनीला दिले जातात. मात्र, यासाठी एक महत्वाची अट म्हणजे, मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेले एकूण प्रीमियम 105% पेक्षा कमी नसावेत.