खासगी नोकरदारांना ही योजना फलदायी; जाणून घ्या सविस्तर लाभ By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:37 PM 2023-09-25T12:37:31+5:30 2023-09-25T13:22:52+5:30
नोकरदार वर्गासाठी व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड (व्हीपीएफ) सर्वोत्तम पर्याय आहे. यात पीपीएफ, एनएससी आणि सेव्हिंग बाँड्स यांसारख्या निश्चित परतावा देणाऱ्या अल्प बचत योजनांपेक्षा अधिक परतावा मिळतो. नोकरदार वर्गासाठी व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड (व्हीपीएफ) सर्वोत्तम पर्याय आहे. यात पीपीएफ, एनएससी आणि सेव्हिंग बाँड्स यांसारख्या निश्चित परतावा देणाऱ्या अल्प बचत योजनांपेक्षा अधिक परतावा मिळतो.
सध्या व्हीपीएफमध्ये ईपीएफएवढा म्हणजेच ८.१५ टक्के परतावा मिळतो. खाजगी नोकरीतील कर्मचाऱ्यांसाठी जुन्या कर प्रणालीत ईपीएफ-व्हीपीएफमध्ये वार्षिक २.५० लाखांची गुंतवणूक व त्यावरील व्याज करमुक्त आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा ५ लाख रुपये आहे.
केव्हा करावी गुंतवणूक? ईपीएफमधील वार्षिक गुंतवणूक २.५० लाखांपेक्षा कमी असल्यास व्हीपीएफमध्ये तत्काळ गुंतवणूक करावी.
व्हीपीएफमध्ये जमा केल्या जाणाऱ्या रकमेत वर्षातून २ वेळा बदल करता येतो.
किती करावी गुंतवणूक मूळ वेतन : ४०,००० रुपये ईपीएफमधील वार्षिक गुंतवणूक (४०,००० च्या १२ टक्के) : ५७,६०० रुपये
व्हीपीएफमध्ये कमाल करसवलत : २,५०,०००-५७,६०० = १,४२,००० रुपये (वार्षिक १.४२ लाख रुपयांची गुंतवणूक करमुक्त असेल.)
अशी करा गुंतवणूक कंपनीच्या एचआर विभागामार्फत व्हीपीएफ खाते उघडता येते. व्हीपीएफमध्ये किती योगदान द्यायचे, याचा एक अर्ज भरून द्यावा लागतो.